भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) इंडिया आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे पाटील यांचा प्रचार दौरा कर्जत तालुक्यातील नेरळ पंचायत समिती प्रभागात महा आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार , काँग्रेस पक्ष , शेकाप , आप , समाजवादी पक्ष , व इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन उमेदवार संजोग भाऊ वाघेरे पाटील यांना ” मशाल ” या चिन्हावर मत देवून प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले.
नेरळ पंचायत समिती प्रभागात नेरळ ग्रामपंचायत हद्दीत दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता या गावनिहाय प्रचार दौऱ्यात कर्जत खालापूर मतदार संघातील महा आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदरचा दौरा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख – नितीन दादा सावंत , उत्तम शेठ कोळंबे – शिवसेना कर्जत तालुकाप्रमुख , संजय गवळी – काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष , रामशेठ राणे – शेतकरी कामगार पक्ष, तालुका सचिव , शंकर भुसारी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता . यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष तथा रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरेश दादा टोकरे , राजाराम शेळके , बाबू घारे आदी प्रमुख हे देखील प्रचारात उपस्थित होते.
यावेळी देशाबरोबरच राज्यात वाढलेली महागाई , भ्रष्टाचार , बेरोजगारी , महिलांची असुरक्षितता हे मुद्दे मतदारांना पटवून देवून इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे पाटील यांना का निवडून देण्याचे , याचे महत्त्व शिवसेना कर्जत तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे यांनी तसेच आघाडीचे पदाधिकारी , महिलावर्गांनी , कार्यकर्त्यांनी मतदारांना समजावून सांगितले.
यावेळी दिव्यादिप हॉटेल नेरळ येथून सुरू झालेला हा प्रचार दौरा संपूर्ण नेरळ परिसरात फिरला . मिळालेल्या प्रतिसादामुळे महा आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी होणार , असेच काहीसे चित्र येथे दिसत होते . नेरळ प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या प्रभागातून ५० हजार मतांची आघाडी घेणार , असे मत तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे यांनी व्यक्त केले.