भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देवून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . त्यांचे हात या निवडणुकीत मजबूत करण्यासाठी सर्व पक्ष व संघटना त्यांना मदत करून पाठींबा देत असतानाच आज ” स्वराज्य – संविधान रक्षक सेना पँथर आर्मी चे प्रदेश अध्यक्ष पँथर सुशील भाई जाधव ” यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवार ” सुधाकर भाऊ घारे ” यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या मदतीला धावून आले आहेत . या मतदार संघात ” पँथर सेनेची ” असलेली ताकद अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्या पाठीशी ठाम असून त्यांना १० हजारांचे मताधिक्य मिळवून देणार , असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले . यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांच्या समवेत, कर्जत तालुका अध्यक्ष रोहित जाधव , कर्जत उपाध्यक्ष पॅंथर आशिषभाई खंडागळे , पॅंथर प्रशांत जाधव आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास कार्याला साथ , तर अन्याय अत्याचारावर मात , यावर ” सुधाकर भाऊ ” च करतील आघात , असे पँथर सेनेचे प्रदेश अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांनी प्रतिक्रिया देत या मतदार संघाचा जसा विकास व्हावा तसा झाला नाही , सुधाकर भाऊ घारे यांनी गोर गरीब , आदिवासी बांधवांसाठी केलेले कार्य अमूल्य असून आम्ही त्यांच्या कार्याला पाठींबा देत आहोत , या मतदार संघात अन्याय अत्याचार घालविण्यासाठी आपल्याला त्यांना निवडून द्यायचे आहे . या प्रभागात तरुणांना रोजगार नाही , महिला भगिनी सुरक्षित नाहीत , गुन्हेगारी वाढली आहे , पाणी टंचाई आहे , या विरोधात आम्ही सर्व समाज बांधवांत जनजागृती करणार आहोत . यासाठीच आपल्याला बदल घडवायचा आहे . आम्ही सर्व प्रभागात जाऊन सुधाकर भाऊंचे कार्य समाजात जाऊन सांगणार आहोत . कर्जत मतदार संघातील सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना निवडून देण्याचे आवाहन करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशिल भाई जाधव यांनी मत व्यक्त केले आहे.
यावेळी पँथर सेनेने दिलेल्या पाठींब्यामुळे सुधाकर भाऊ घारे यांची ताकद या मतदार संघात वाढली असून दिवसेंदिवस त्यांचे पारडे जड होत चालले आहे , असेच एकंदरीत चित्र दिसत आहे.