भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर येणाऱ्या काळात अन्याय – अत्याचार विरोधात लढणाऱ्या दलित पँथर ते आजची बाबासाहेबांची आरपीआय , या संघर्षमय वाटचालीत ज्या महाविभूती शिलेदारांनी सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – न्यायिक क्षेत्रात आपले तन – मन – धन कर्जत तालुक्यातील समाजासाठी अर्पित करून लढा उभारला , त्या रत्नांचा ” समाजरत्न ” हा मानाचा पुरस्कार देणे ,व त्यांचा सन्मान करणे , हे आमचे कर्तव्य आहे , असे भावनिक मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) चे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) कर्जत तालुका यांच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा ” समाज रत्न ” सन्मान सोहळा रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ – ३० वाजता जॉय फार्म , तांबस , ता.कर्जत येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात व दिमाखात संपन्न झाला .चळवळीत काम करत असताना आपण जे समाजासाठी झटतो त्याचे फलित होण्याचा हा सन्मान सोहळा तसेच आरपीआय ची संकल्पना – चळवळ – समाजासाठी असलेली तळमळ तळागाळात पोहचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी विचार पिठावर आरपीआय कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश भाई गायकवाड , जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड , रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , युवा अध्यक्ष प्रमोद महाडिक , मावळ अध्यक्ष चिंतामणी दादा सोनावणे , ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , कर्जत ता. महिला अध्यक्षा अलका सोनावणे ,संघटक वर्षा चिकणे , जिल्हा उपाध्यक्ष नरेश गायकवाड , तानाजी गायकवाड , कर्जत शहर अध्यक्षा वैशाली महेश भोसले ,नेरळ शहर अध्यक्षा सुरेखा कांबळे ,ता.कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड , ता.सचिव आण्णा खंडागळे , ता. उपाध्यक्ष अंकुश सुरवसे , सहसचिव जीवक गायकवाड , युवक अध्यक्ष अमर जाधव , नेरळ अध्यक्ष दिनेश आढाव , उद्योजक नाईक , स्वप्नील गायकवाड ,ता.सचिव उज्वला सोनावणे , कविता शिंदे , उपाध्यक्ष बबलू ढाले , भालचंद्र गायकवाड , जगदीश शिंदे , त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते , महिला आघाडी उपस्थित होते.
भाई जगदीश गायकवाड पुढे म्हणाले की , सिनिअर सिटीझन म्हणून माणूस कधीच रिटायर्ड होत नाही ,धर्मानंदजी गायकवाड व ता.अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी आयोजित केलेल्या या ” समाज रत्न सन्मानाने खूप एनर्जी येणार , यावर प्रकाश टाकत जेष्ठांनी तरुणांचे केडर कॅम्प घेतले पाहिजे , पँथर निर्माण झाला म्हणून आज आम्ही आहोत , म्हणून जेष्ठ समाजरत्न आमची प्रेरणा आहेत . या शब्दात त्यांनी समाजरत्न असलेल्या सन्मानित मान्यवरांचा सन्मान वाढविला.
पक्षातील विरोधकांवर लक्ष करत ता अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्यावर बोट दाखविणारे ” कमर्शियल लीडर ” आहेत , असा उल्लेख केला . तर बाबासाहेबांचे खरे वारसदार हे रामदास आठवले साहेब आहेत ,यावर प्रकाश टाकला . कर्जत मधील ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन ” होण्यास १४ वर्षे लागली , जेष्ठांनी दिलेला लढा हा जरी संघर्षमय असला तरी भविष्यात याचा अभ्यास करून १४ दिवसांत भवन मंजूर करण्याची ” भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली . राजकीय तिजोरी समाजासाठी उपयोगात आणायची असेल तर सत्तेत जाणे गरजेचे आहे , हा सल्ला देखील त्यांनी उपस्थितांना दिला.
बुद्ध – छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी विचार धारा या समाजात टिकवले असे पँथर ते आरपीआय या संघर्षमय शिलेदारांना त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मानाचा ” जयभीम ” केला .यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड , जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , महिला ता.अध्यक्षा अलका सोनावणे , जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक , कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , यांनी आपले विचार मांडले , तर सत्कारमूर्ती पी.एस.गायकवाड , मनोहर ढोले , के.के.गाडे , बंधू अभंगे , विजय डाळिंबकर यांनी आपले संघर्षमय अनुभव व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील चंदर गायकवाड , सुरेश सोनावणे , सखाराम सोनावणे , दामू जाधव , वसंत मामा सुर्वे , चंद्रकांत साळवी , अंकुश जाधव , मधुकर रोकडे , गुलाब शिंदे , हरिश्चंद्र सोनावणे , द. बा.जाधव , विजय डाळींबकर , लक्ष्मण जाधव , तुकाराम गायकवाड , बबन गायकवाड , किसन रोकडे , मधुकर शिंदे , शरद मोरे , अशोक हिरे , प्रकाश पगारे , भीमराव जाधव , पांडव गुरुजी , नंदू जाधव , मनोहर बोदडे , सुरेश खंडागळे , रमेश गायकवाड , काशिनाथ गायकवाड , पोशिराम गायकवाड , हरिश्चंद्र गवळी , मिलिंद गवळी , नामदेव कांबळे , हरिश्चंद्र आढाव , ए.डी. जाधव , बबन रामा गायकवाड , मनोहर खंडू ढोले , रमेश खैरे , के.के.गाडे , गणपत गायकवाड , तुकाराम ढोले , दौलत ब्राह्मणे , बंधू लक्ष्मण अभंगे , अशोक गायकवाड , सुरेश गायकवाड , अनंत गायकवाड , पांडुरंग गायकवाड , एन.बी.आढाव , हरिश्चंद्र सदावर्ते , गोपाळ जाधव , रामचंद्र बागुल , हिराबाई हिरे या रत्नांचा ” समाजरत्न ” हा मानाचा सन्मानपत्र पुरस्कार व शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी सूत्रसंचालन रायगडभूषण राजेश गायकवाड यांनी केले.