Tuesday, September 17, 2024
Homeपुणेमावळपक्षाचा वर्धापन दिन, राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी शालेय खाऊ...

पक्षाचा वर्धापन दिन, राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी शालेय खाऊ वाटप…

लोणावळा (वार्ताहर): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) या पक्षाचा वर्धापनदिन संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा होत असताना मावळ तालुक्यात देखील खंडाळा येथील आदिवासी मुलांच्या अंगणवाडी शाळेत दि.27 रोजी शालेय साहित्य व खाऊचे वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कडून करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.सध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध घटना व रायगड येथील दुर्दैवी दुर्घटना या मुळे भाऊंचा वाढदिवस साजरा न करण्याचे आदेश असल्याने समाज उपयोगीच कार्यक्रम करण्यावरच भर असल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मा. अंकुशभाऊ चव्हाण यांनी केले,तर यावेळी महा.सचिव मा आरुणभाऊ भिंगारदिवे, प.महा.कार्याध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, नामदेव राठोड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेशजी भोसले ,पुणे जिल्हा युवक सरचिटणीस मा प्रविणजी पवार,मावळ तालुका अध्यक्ष मा चंद्रकांत ओव्हाळ, उपाध्यक्ष विनोद कालेबाग, उपाध्यक्ष जे.के.गरड, तळेगाव उपाध्यक्ष गायकवाड, लोणावळा शहर उपाध्यक्ष लतिफ शेख, लोणावळा युवक अध्यक्ष निलेश देसाई,तालुका युवक उपाध्यक्ष सचिन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच पुणे शहर व मावळ तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ यांनी केले, व आभार आंगणवाडी शिक्षिका सौ साधना नाईक व रेश्मा सुर्यवंशी यांनी मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page