Friday, September 20, 2024
Homeपुणेमावळपत्नी सरपंचांच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या पतीराजांवर होणार कारवाई…

पत्नी सरपंचांच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या पतीराजांवर होणार कारवाई…

मावळ (प्रतिनिधी): मावळ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच किंवा त्यांचे पतीराज तसेच इतर नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करत असल्याने अनेक ठिकाणी वादंग प्रकारांमुळे सरपंच, सदस्यांच्या नातेवाइकांनी कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मावळ गट विकास अधिकारी सुधीर पी. भागवत यांनी दिली आहे.
मावळातील ग्रामपंचायतिच्या महिला सरपंच व महिला सदस्यांचे पती व नातेवाईक ग्रामपंचायतिच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करत आहेत.यामुळे ग्रामसेवक, ग्रामस्थांनाही याचा त्रास होत असून यामुळे महिला सरपंचाच्या स्वातंत्र्यातही गदा येते.त्यामुळे अशा पतीराज व नातेवाईकांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
मावळ तालुक्यात 103 ग्रामपंचायती असून त्यामध्ये महिलाराज सरपंच व उपसरपंच असलेल्या 51 ग्रामपंचायती आहेत.यातील बहुतांश ठिकाणी महिला सरपंच यांचे पती किंवा नातेवाईक हस्तक्षेप करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
या आहेत महिलाराज असलेल्या मावळातील ग्रामपंचायती – सुदवडी, माळवाडी, मळवंडी ठुले, आढले खुर्द, वराळे, आपटी, येळसे, मोरवे, कडधे, शिळींब, शिवली, मळवंडी पमा, ओव्हळे, दिवड, चांदखेड, साळुंब्रे, शिरदे, वडेश्वर, कुसवली, धामणे, परंदवडी, नाणे, कांब्रे ना.मा, सोमाटणे, नाणोलीतर्फे चाकण, वेहेरगाव, आढे, ताजे, कार्ला, साई , इंगळुन, कशाळ, जांबवडे, नवलाख उंब्रे , वडेश्वर यासह अन्य गावांत महिला सरपंच, आहेत तर काही गावात उपसरपंच आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page