![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” व्हॉईस ऑफ मिडिया ” या पत्रकार संघटनेचे कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत मध्ये शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी कर्जत तालुक्यातही निर्भीड पत्रकार ” प्रथमेश कुडेकर ” यांच्या वर सायंकाळी ७.०० वाजता कर्जत चारफारा परिसरात कृषी संशोधन केंद्राच्या गेटजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी मुठ , हाता बुक्यांनी , लोखंडी रॉड , सळई , धारदार शस्त्राने हल्ला करत ” जीवेनिशी ठार ” मारण्याचा प्रयत्न केला . या हल्ल्यात कुडेकर बालंबाल बचावले असून यावेळी त्यांच्या सोबत असलेला त्यांचा मित्र मयूर रणदिवे याने जीवाची पर्वा न करता स्वतःवर मार घेत त्यांना बचावले , तर सुनसान रस्त्यावर जाणाऱ्या चार चाकी वाहने थांबल्याने हे हल्लेखोर आपल्या चारचाकी वाहनांतून पसार झाले . या निंदनीय घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून ” लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर ” हा जीवघेणा हल्ला असल्याने सर्वत्र या घटनेचा ” निषेध ” व्यक्त होत आहे.
पत्रकार प्रथमेश कुडेकर हे अतिशय रोखठोक बातमी करणारे कर्जत तालुक्यातील पत्रकार आहेत . दैनंदिन राजकीय घडामोडी, नागरिकांच्या समस्या , कुणावर अन्याय अत्याचार झालेला असेल , पत्रकार परिषद , मोर्चे , निवेदने , अश्या सर्व घडामोडी सर्वांत प्रथम ” कर्जत सुपरफास्ट ” या यू ट्यूब चॅनल च्या माध्यमातून बातमी प्रसार करतात . ” लोकशाहीचा चौथा स्तंभ ” , तर समाजातील गोर गरिबांचा अन्याया विरोधात खरा ” आरसा ” दाखवणारा हा पत्रकार ” अजातशत्रू ” असताना पत्रकार ” प्रथमेश कुडेकर ” व त्यांचे मित्र ” मयूर रणदिवे ” यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी धारदार शस्त्रांनी अचानकपणे हल्ला केल्याने या हल्ल्यात कुडेकर गंभीर जखमी झाले असून, या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले आहेत . हे हल्लेखोर तोंडाला मास्क बांधून आलेले असल्याने ते पूर्व नियोजित कट करून आलेले होते , त्यामुळे हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून ” मुक्त पत्रकारितेवर ” झालेला हल्ला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पत्रकार बांधवांत भीती आणि संतापाची भावना पसरली असून हे कृत्य अत्यंत भ्याड, अमानवी आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून या भ्याड हल्ल्याचा ” व्हॉईस ऑफ मिडिया ” या संघटनेच्या कर्जत खालापूर तालुक्यातील पत्रकारांनी संतप्त निषेध नोंदवत हल्लेखोर गुंडांना व या भ्याड हल्ल्यामागील खरा सूत्रधार कोण ? हे शोधून त्यांना त्वरित पकडून कठोर कारवाई करावी , अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक नवले यांनी निवेदन स्वीकारले .