Sunday, November 24, 2024
Homeपुणेमावळपवना धरणातील पाणी साठा होतोय झपाट्याने कमी सध्या 58.46 टक्के पाणी साठा...

पवना धरणातील पाणी साठा होतोय झपाट्याने कमी सध्या 58.46 टक्के पाणी साठा शिल्लक…

पवन मावळ : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडच्या पाण्याचे स्रोत असलेल्या पवना धरणात सध्या 58.46 टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला आहे.

मावळासह पिंपरी चिंचवडला पाणी पुरविणाऱ्या पवना धरणाची 8.51 टी. एम.सी.इतकी पाणी साठवण क्षमता आहे ,1995.80 इतकी पाणी पातळी असून सध्या 4976.80 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त साठा पवना धरणात आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबर मध्ये पवना धरण 100 टक्के भरले होते . यावर्षी 1 जून पासुन आज अखेर 2716 मीमी एवढा पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेरीस 64.43 टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात 6 टक्के कमी पाणी साठा शिल्लक आहे.

हा शिल्लक पाणी साठा साधारणतः जुलै महिन्याच्या सुरवातीपर्यंत पुरेल अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे .तरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन पवना धरण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनवर तांबोळी व पवना नगरचे उपसरपंच अमित कुंभार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

तसेच सध्या पाणी काठकसरीने वापरले नाही तर पाणी साठा कमी असल्यामुळे आपणांस भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, व सध्या पवना धरणातील पाणी साठ्याचा आढावा देत प्रशासनाने पाणी वाचविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करावी असेही कुंभार म्हणाले.

- Advertisment -

You cannot copy content of this page