पवनानगर (प्रतिनिधी) : पवना धरणातून 10 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील चार पाच दिवसांपासून पावसाची संतधार सुरु असल्यामुळे पवना धरण 100 टक्के भरले असून आज शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून 7800 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला तर दुपारी तीन नंतर 10,000 क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
पवना धरणातून मोठया प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे . तर याठिकाणच्या शाळांनी सुट्टी देखील जाहीर केली आहे. गेल्या 4/5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे . धरणाच्या सांडव्यातुन व जलविद्युत केंद्रातुन 7 हजार 800 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातून सुरुवातीला 7800 क्युसेक्सने विसर्ग सुरू केला होता . मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने दुपारी तीननंतर हा विसर्ग वधुवून 10,000 क्युसेक करण्यात आला आहे . त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी काले येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारा येवा याचे प्रमाण बघून धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.