पवना नगर (प्रतिनिधी ):आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प विरोधातील आंदोलनात शहीद शेतकऱ्यांना आज शहीद स्थळी श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
आज या आंदोलनास 11 वर्ष पूर्ण झाली असून आज या शहीदांचे अकरावे पुण्यस्मरण असून या आंदोलनामध्ये शहीद झालेले शेतकरी कै कांताबाई ठाकर, शहीद कै मोरेश्वर साठे व शहीद कै शामराव तुपे यांच्या शहीद स्मृतीस अभिवादन व श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद स्थळी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग येथे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , सरपंच बबनराव खरात , माजी उप – तालुका प्रमुख मारुती भाऊ खोले , माजी उपसरपंच अनिल भालेराव , पवना नगर शिवसेना शहरप्रमुख सुरेश गुप्ता , सुनील इंगुळकर , माजी उपसपंच श्याम बाबू वाल्मिकी , सनी मोहिते , कार्यालय प्रमुख तुषार घाग, उमेश ठाकर शाखाप्रमुख , रामभाऊ डोंगरे , बबन खरात आदी पदधिकारी उपस्थित होते.