पवना नगर : पवना नगर हद्दीतील तिकोनापेठ येथील एका 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि.18 ) रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
गुरुदास भाऊ मोहोळ ( वय 22, रा. तिकोना पेठ, पवना नगर ) असे या युवकाचे नाव आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गुरुदास मोहळ याने आईचे आजारपण व गरिबीच्या नैराश्यातुन त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे वनक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या एका झाडाच्या फांदीला सूती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार विजय गाले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेहाचा पंचनामा केला आहे.
गुरुदास मोहळ हा वयाच्या 12 व्या वर्षांपासून तिकोणा गडाचा गडपाल म्हणून गडाची स्वच्छता, देखरेख तसेच विविध सण उत्सव साजरा करत होता. गुरुदास मोहोळ याने तिकोणा गडावरील दक्षिण बाजूच्या गुहेचा शोध लावला होता . गड भटकंती दुर्ग संवर्धन वडगाव मावळ संस्थेचा सह खजिनदार म्हणून हा काम करत होता . त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तालुक्यातील शिवभक्तांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे . पुढील तपास पोलीस हवालदार विजय गाले करत आहेत.