पवना नगर दि.९ : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प आंदोलनास आज 9 ऑगस्ट रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या आंदोलनात शेतकरी वर्गाचा प्रचंड सहभाग होता. त्यावेळी या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे श्यामराव तुपे या शहीदांना शिवसेना परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
गेली दहा वर्ष शिवसेना परिवाराकडून घटनास्थळी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाजवळ याच ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र भाऊ खराडे, पवनानगर शिवसेना शहर प्रमुख सुरेश गुप्ता, पवनानगरचे माजी उपसरपंच अनिल भालेराव, पवनानगर युवासेनेचे अध्यक्ष विकास कालेकर, गटप्रमुख सचिन कालेकर, शाखाप्रमुख उमेश ठाकर ,शाखाप्रमुख किशोर शिर्के, प्रवीण वैष्णव, अक्षय घोंगे, तेजस खराडे, चिराग खराडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.