मावळ (प्रतिनिधी ) : 9 ऑगस्ट 2011 रोजी क्रांतीदिनी पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात केलेल्या आंदोलनातील झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी मृत पावले . त्यांचे आज 11 वे पुण्य स्मरण असून अष्ट दिशा न्यूज कडून शहीद कांताबाई ठाकर, शहीद मोरेश्वर साठे व शहीद शामराव तुपे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
या घटनेला 11 वर्षे पूर्ण होत आहेत .पवना बंदीस्त जलवाहिनी या प्रकल्पात स्थानिक भूमीपुत्रांना विचारात न घेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा प्रकल्प राबवत होती . त्यामुळे याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी , शिवसेना , काँग्रेस आय तसेच या भागातील स्थानिक पक्ष व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते . या आंदोलनाला हिंसक वळण लागले व यात कांताबाई ठाकर , श्यामराव तुपे , मोरेश्वर साठे , या तीन निष्पाप शेतकऱ्यांचे बळी गेले . तर यात 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर 307 सारखे गुन्हे दाखल करण्यात आले .
यानंतर या बंद जलवाहिनी प्रकल्पाला विरोध करणारे म्हणजे भाजप – शिवसेनेचे सरकार 2014 ते 2019 पर्यंत सत्तेत होते . या 5 वर्षात तीन मृतांच्या वारसांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकऱ्या देण्यात आल्या . शहिद शेतकऱ्यांचे स्मारक उभारण्यात आले . शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले . मात्र सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प अद्यापही कायम रद्द केलेला नाही.