भ्रष्ट डॉक्टरांवर पवना हॉस्पिटल प्रशासनाचे दुर्लक्ष… सामान्य नागरिकांची होत आहे लूट….
तळेगाव दि.23: तळेगाव, सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मधील ऐका डॉक्टर व सहकारयाला लाच घेताना रंगेहात अटक.
सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये हा भयानक प्रकार घडला आहे. ह्या हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार घेणारा रुग्ण बाळू नामदेव आंद्रे ( रा. नाणे, मावळ )हा मागील सहा महिन्यांपासून पवना हॉस्पिटल मध्ये शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत
डायलिसिस वर उपचार घेत असताना डॉ. सत्यजित कृष्णकांत वाढोकर (रा. पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा, मावळ )व सहकारी प्रमोद वसंत निकम ( रा. दत्तवाडी, आकुर्डी, हवेली ) ह्या दोघांना रुग्णाकडून 9000/रु. लाच घेताना रंगेहात पकडले.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे मधील पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस नाईक वैभव गोसावी, चालक पोलीस हवालदार प्रशांत वाळके यांच्या पथकाने सापळा रचून डॉ. सत्यजित व प्रमोद निकम यांना रुग्णाकडून लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली.