मावळ (प्रतिनिधी):पवन मावळ तहसीलदारपदी अजित दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नवनियुक्त तहसीलदारांकडे काले कॉलनी व शिवणे मंडल विभागातील 60 गावांचा कार्यभार असणार असून मावळ तालुक्याला पहिल्यांदाच दोन तहसीलदार मिळाले आहेत. मावळ तालुक्यात एकूण 190 गावे आहेत. त्याचा भार एकाच तहसीलदारावर येत असल्याने तालुक्यातील 60 गावांसाठी अपर तहसीलदार अजित दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांची कामे जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
मावळ तालुक्यातील 190 गावांतील वतन, कुळ कायदा, निवडणुका, जमीन वादाच्या केसेस व इतर महसुली कामे तहसील कार्यालयात चालतात. अपर तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे काले कॉलनी व शिवणे मंडल विभागातील 60 गावांचा महसुली कारभार असणार आहे. दोन तहसील झाल्याने नागरिकांची कामे देखील जलद गतीने येत्या काळात होण्यास मदत होणार आहे.