पवनानगर (प्रतिनिधी) : पवन मावळ भाजपा सोशल मिडिया अध्यक्षपदी ब्राम्हणोली येथील अंकुश काळे यांची निवड जाहीर करण्यात आली.आज वडगाव मावळ येथे पक्ष कार्यालयात भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते काळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले .
अंकुश काळे यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून भाजपाशी एकनिष्ठ असलेले कुटुंब आहे . अंकुश हे सध्या ब्राम्हणोली येथील जय हनुमान ढोल मंडळाचे अध्यक्ष आहेत .ढोल पथकाच्या माध्यमातून त्यांचा विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग आहे. या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करुन आर्थिक साधन म्हणून ढोल पथकाचा उपयोग करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे .
तसेच क्रिडा क्षेत्रात पवन मावळ मल्ल सम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षे कुस्ती स्पर्धा आयोजित करुन नवनवीन तरुण मल्ल घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत . या अनेक उपक्रमामुळे पवन मावळातील तरुणांशी त्यांचा चांगला संपर्क आहे . याचीच दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे .भाजपा संघटनमंत्री गणेशभाऊ ठाकर यांच्या मार्गदर्शाखाली काळे यांची निवड करण्यात आली .
यावेळी तालुका महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे , विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे , ग्रामपंचायत सदस्य वसंत काळे , ब्राम्हणोली भाजपा अध्यक्ष शंकर काळे पाटील , युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे , संघटनमंत्री किरण राक्षे , मावळ तालुका भाजपा क्रिडा आघाडीचे सरचिटणीस संतोष दळवी , सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे , धोंडीबा काळे , शंकर काळे आदी उपस्थित होते.