Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपाटील आळी - खाटीक आळीत उमेदवार " श्रीरंग आप्पा बारणे " यांचा...

पाटील आळी – खाटीक आळीत उमेदवार ” श्रीरंग आप्पा बारणे ” यांचा घूमला आवाज !

शहर संघटक ” नदीम भाई खान ” यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात आघाडी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला . हा गड टिकवून ठेवण्यात शिवसेनेचे कर्जत शहर संघटक नदीम भाई खान हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत . खाटीक आळीत साईनगर येथून आपल्या संपर्क कार्यालय असलेल्या ” महेंद्र गडावरून ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली व नगरसेवक ऍड. संकेत भासे यांच्या सहकार्यातून सामाजिक – राजकीय – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांचा येथील नागरिकांशी , व तरुणाशी दांडगा जनसंपर्क आहे.
याचाच फायदा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना होणार असून नुकतीच खाटीक आळी, साईनगर , पाटील आळी तसेच बाजारपेठेत प्रचाराच्या फैरी झडल्या . याप्रचारात महायुतीतील घटक पक्ष असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला आघाडी प्रचारात अग्रेसर होते.

शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – आर पी आय , मनसे – इतर घटक पक्षाने अनेक पदाधिकारी घेवून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा जोरदार प्रचार करून परिसरात ” कोण आला रे कोण आला , शिवसेनेचा वाघ आला ” , अश्या घोषणा देत निशाणी ” धनुष्य बाण ” याचा प्रचार जोरदार करत प्रचारात आघाडी घेतली . प्रत्येक घरात , दुकानात जाऊन मतदारांना मत देण्याचे सांगून आपले उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करून विजयाची ” हॅट्रिक ” साधण्यास मदत करा , असा प्रचार करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page