if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” मोबाईल व फॅशनेबल दुनियेत ” आजचा विद्यार्थी व विद्यार्थिनी ” कॉलेज विश्वात ” गेल्यावर काय करेल , कसा वागेल ? याची चिंता साहजिकच पालकांना नेहमीच असते , मात्र विद्यार्थांना भावनिक दृष्ट्या सक्षम बनवून पालकांनी दृष्टिकोन बदलून व विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवल्यास नक्कीच ” बिघडणारे ” विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाने ” घडतील ” , असे प्रभावी मत ” मनःस्वास्थ्य क्लिनिक कर्जतच्या प्रसिद्ध समुपदेशक देवश्री जोशी ” यांनी आजच्या चिंताग्रस्त पालकांसाठी समुपदेशन केले आहे.
आजच्या घडीला पालक आणि विद्यार्थी यांच्यात एक ” संवादाची पोकळी ” निर्माण झाली आहे . आताच १० – १२ वी चे निकाल लागले आहेत , खूप जणांना अपेक्षे पेक्षा छान मार्क्स / गुण मिळाले असतील तर काही जणांना नसतीलही . प्रत्येकाचे ऍडमिशन कुठे घ्यायचे हे ठरलं असेल, तसेच खूप जणांची मुले यंदा १० वी मध्ये गेले असतील. शिक्षणात आता स्पर्धा खूप वाढलेली आहे, NEET चे cut off नेहमीच खूप लागत आहेत. पण ह्या सगळ्यात आपला मुलगा / मुलगी बाहेरच्या जगात जाणार आहे , त्याची किती आणि कोणी कोणी तयारी करून घेतली ? त्यात काय तयारी करून घ्यायची ? अजून अभ्यास , अजून जास्त स्पर्धा हे दरवर्षी वाढणारच आहे आणि असणारच आहे. पण किती पालकांना खात्री आहे की माझा मुलगा किंवा मुलगी घरी सुखरूप येईल ? १० वी पर्यंत आम्ही खूप जपलं आहे , आमच्या सतत डोळ्यासमोर असायचे . त्यामुळे आमचां पाल्य अजिबात हाताबाहेर गेला किंवा गेली नाही. हे चांगलेच संस्कार आहेत , मग आता कॉलेज विश्वात गेल्यावर का विश्वास नाही ? तर पालकांचे एकच उत्तर असत की , ” संगत ” . आताची मुलं – मुली , बापरे , बया बया , काय ते कपडे , काय ते बोलणं , काही विचारू नका , अगदी धस्स चं होतं बघा , माझ्या काळजात.” पण जर तुमचां मुलगा / मुलगी १० वी पर्यंत बघिडली नाही तर आता का बिघडेल हो ? जर तुमच्या पाल्यांना चांगल काय , वाईट काय , हे कळत , तर बिघडणार कसे ? या कॉलेज विश्वात आमचा लाडावलेला पाल्य जरी आमच्या समोर व्यवस्थित वागत असेल पण तिथे कोण लक्ष ठेवणार . ” संगत व मोहपाशात ” ओढून त्याला किंवा तिला जर कुणी फसवल तर ? आमचा मुलगा / मुलगी अभ्यासात हुशार आहेत पण त्यांना व्यवहारज्ञान कुठे आहे ? अशी काळजीयुक्त आई आपले मत मांडते , यावर समुपदेशक देवश्री जोशी यांनी प्रकाश टाकला . पण मग आपण पालक म्हणून आपला मुलगा / मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे पण व्यवहारज्ञान नाही किंवा कमी आहे , आपला पाल्य आता १६ वर्षांचा झाला आहे तर त्याला काय चांगल काय वाईट किंवा आपण कोणाशी बोलावं एवढं समजणं तरी अपेक्षित आहे. आणि जर हे समजत नसेल तर पालक म्हणून तुम्ही कुठेतरी कमी पडला तर नाहीत ना ? हा प्रश्न उपस्थित होत आहे . मग काही विपरीत घडून आपल्या पायाखालची जमीन सरकण्याच्या आधिच काळजीत असलेल्या आई वडिलांनी काही माहिती जाणून घेणे खूप गरजेचे असल्याचे मत समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केले.
प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा / मुलगी लहानच आहे असे वाटते . ” ह्यांना काय समजतंय ” , असे म्हणत त्यांना पुढे जाण्याचा मार्ग आपण ” खुंटत ” आहोत का ? आपण किती जण मुलांसोबत बसून काय चांगल , काय वाईट , जग कसं बदलत चालल आहे , ह्या अशा सामाजिक गोष्टींवर वेळ जायच्या आधी बोललो आहोत का ? मोबाईल काळाची गरज आहे आणि तो चालवता आलाच पाहिजे , पण माझं मुलगा / मुलगी त्यावर वाटेल ते रात्री बघतं असतात का ? आणि हे पालक म्हणून आपल्याला माहितच नसेल तर माझी मुलगी एका मुलासोबत त्याचा हात हातात घेऊन उभी होती , इतकं कसंतरी झालं बघून काय सांगू ? आमच्या घरात असं नाही कोणी ” लफडेबाज ” ह्यांना समजलं तर शाळा कॉलेज ला पाठवणारच नाही हो ? ह्यात त्या पाल्यांचे वागणं चूक आहे का ? तर अजिबातच नाही . कारण त्यांना जे आजूबाजूला बघायला मिळत आहे , जे घडतं आहे , ती मुलं तसेच वागणारच , पण तुमचा मुलगा मोबाईलवर कुणाशी बोलतो , किंवा तुमची मुलगी घरच्या बाहेर कोणाला भेटते , भेटून काय करते ?ह्याची माहिती तुम्हाला असणं पालक म्हणून आवश्यक नाही का ? जर तुमचा तुमच्या पाल्यांशी सवांद असेल तर ते नक्कीच घरात सांगणार , अशी मनाला वेधणारी माहिती समुपदेशक देवश्री जोशी यांनी कथन केली.
आज मुलांचं जे वय आहे , ह्या वयात कुतूहल , एकमेकांविषयी आकर्षण , मैत्री प्रेम ह्या सगळ्या गोष्टी येणारच , आपणही या वयातून गेलो आहोत . पूर्वी नात्यांविषयी, घरच्यांविषयी थोडीशी भीती व आपुलकी असायची ती आज अजूनही जिवंत आहे . पण पालक म्हणून आपण घरात सवांद साधणं , सतत ह्यामध्ये ” तुला काहीच कळत नाही ” आणि आम्हाला सगळं कळतं असं जर मुलांशी बोलायला सुरुवात केली , तर तिकडेच सवांद संपून ” वादच ” होतील , त्यामुळे त्याला विचारा ” काय वाटतंय तुला कॉलेज विषयी ?आज मी तुला एका मुलीचा / मुलाचा हात हातात घेताना बघितलं पण हे चुकीचं नाही तुला असं अगदीच वाटू शकत , पण तू हे जे काही रस्त्यात , झाडाच्या मागे उभं राहून आणि आमच्या सगळ्यांशी खोटं बोलून हे केलंस ते चुकीचं होतं . तिकडेच तुमचा मुलगा / मुलगी विचार करेल की , आज आई- बाबा मला कसे नाही ओरडले ? तिकडे त्याला नक्कीच समजेल आपण काय करायला हवं होतं आणि काय नको. हा आत्मविश्वास पालकांनी निर्माण केल्यास व बोलण्याचा दृष्टिकोन , भाषा बदलून मुलांवर विश्वास ठेवलात तर नक्कीच आपला मुलगा / मुलगी भावनिक दृष्ट्या सक्षम होवून ” बिघडण्याच्या ” वयात योग्य मार्गदर्शनाने ” घडतील ” , हे जरी एका दिवसाचे काम नसले तरी यांत सातत्य व प्रोसेस असल्यास उत्पन्न होणाऱ्या संवादातून व दिसणाऱ्या चुकीतूनच विद्यार्थी शिकणार आहेत . भरकटलेल्या मनाला जर कुठे वाट अडली तर समुपदेशक म्हणून मी आहेच , काळजी करू नका , ऑनलाईन – ऑफलाईन समुपदेशन करण्यास मी तत्पर आहे , असा मोलाचा सल्ला मनःस्वास्थ्य क्लिनिक कर्जतच्या समुपदेशक देवश्री जोशी – ९५२७६७६००८ यांनी दिला आहे.