अलिबाग : नागाव हायस्कूल व प्राथमिक शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांच्या हातात कधीही आपली दुचाकी चालविण्यास देऊ नये , त्याचे परिणाम पालकांना 3 वर्षे शिक्षा 30 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो यासाठी आपण अजून लहान आहात मोठे झाल्यानंतर वाहने चालवा , काळजी घेतली पाहिजे म्हणून मुलांनी दुचाकी चालवू नये असे आवाहन रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी केले . नागाव येथील हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता त्यात ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक अजित पाटील यांनी रायगड भूषण जयपाल पाटील यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले , यावेळी जयपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना काही पालक अभिमानाने दुचाकी चालविण्यास देतात व यावेळी ज्यांना दुचाकी चालविता येते यांचे अभिनंदन चॉकलेट देऊन जयपाल पाटील यांनी केले व अपघात झाला तर आई – वडिलांना आर्थिक भुर्दंड तर आपल्या लहान वयात हात किंवा पाय तुटुन मौल्यवान जीवही गमवावा लागतो सोबत गाडी मालकास 3 वर्ष शिक्षा व 30 हजार रुपयांचा दंड पडतो याची माहिती दिली तर शाळेत जाता येता रस्त्याने आपली सायकल चालविताना डाव्या बाजूने एका लाईनीतच चालावे अन्यथा अपघाताला सामोरे जावे लागते त्याच बरोबर रस्त्यावर अनोळखी माणसाच्या वाहनात जाऊ नये यात्रेमध्ये अथवा गर्दीमध्ये हरवल्यानंतर यात्रेत असणारे पोलीस काका पोलीस मावशी यांनाच भेटावे अनोळखी माणसा सोबत जाऊ नये ती खबरदारी घेण्यास सांगितली तर आपल्या नेहमीच्या दप्तरामध्ये एका चिठ्ठी मध्ये आई आणि बाबाचा तर दुसऱ्या चिठ्ठीमध्ये आजी – आजोबांचा मोबाईल क्रमांक कायम ठेवावा,आपल्या घरातील वीजेची बटणे यांना हात लावू नये तसेच आपल्या वाडीमध्ये पाण्याच्या पंप लावताना बिना चपलेने जाऊ नये , सध्या पावसाळ्यात पंप लावु नयेच अशी माहिती जयपाल पाटील यांनी दिली या शिबिरास 150 विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना रायगडच्या युवक फाउंडेशन तर्फे जयपाल पाटील व आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे यांनी मास्क चे वाटप केले शेवटी आभार जगदीश चोरगे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक अजित पाटील , जगदीश थोरवे , चंद्रकांत गिरी , सुप्रिया पाटील , मंजूषा पाटील उपस्थित होते.