Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा व लोकप्रतिनिधींच्या नियोजन शून्य कामामुळे शनिवारी कर्जतमध्ये कृत्रिम पाणी...

पालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा व लोकप्रतिनिधींच्या नियोजन शून्य कामामुळे शनिवारी कर्जतमध्ये कृत्रिम पाणी टंचाई !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात जग ” चंद्रावर ” पाऊल ठेवत असून ” माऊंट एव्हरेस्ट शिखर ” चढण्याचा विक्रम करत असताना कर्जत नगर परिषदेच्या काही फर्लांग अंतरावर असलेल्या पाणी योजनेचे नियोजन पालिका प्रशासन , सत्ताधारी व पाणी सभापतींना करता न येणे , तसेच नागरिकांना पाणीसेवा न देता लोकप्रतिनिधी एक प्रकारे अन्यायच करत असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.
ऐन गर्मित जून महिना आला तरी पाऊस पडत नसल्याने पाण्याची सोय हि खूप महत्त्वाची असताना त्यावर पालिका प्रशासनाने सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करा , अशी मागणी असताना देखील बैठक न घेता मात्र पाणी देण्याच्या प्रक्रियेत लक्ष देत नसल्याने व नियोजनाचा अभाव असल्याने पाण्याची कृत्रिम टंचाईला कर्जतकर नागरिकांना सामोरे जावे लागत आहे .यामुळे पालिकेच्या गलथान कारभाराचा महिला वर्गात संताप खदखदताना दिसत असून यामुळे लोकप्रतिनिधी काय काम करतात ? हे उघड होतं आहे.

कर्जत नगर परिषद हद्दीत सर्व प्रभागात पाणी पुरवठा हा वंजारवाडी येथील पेज नदीतून होत आहे . कडाव च्या पुढे असलेल्या या नदीतून पाणी उपसा करून ते कर्जत हद्दीत पोहचविण्याचे काम पालिका प्रशासन करत असते व त्यावर नियोजन व अंकुश लोकप्रतिनिधी ठेवत असतात , मात्र पेज नदी ते कर्जत हद्दीत पाणी येताना येथील ज्या समस्या असतात त्याकडे मुख्यतः लक्ष देणे गरजेचे असते . कडाव परिसरात ” जिओ कंपनीची ” केबल टाकण्याचे काम सुरू आहे . त्यांच्या खोदाई कामामुळे पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
या कंपनीने कडाव ग्रामपंचायत तसेच कर्जत न.प. ची पाण्याची पाईप लाईन असल्याने काम करताना संबंधित अधिकारी वर्गाला संपर्क साधणे गरजेचे होते , व पूर्व परवानगी घेवूनच काम करणे गरजेचे होते , तर पालिकेने देखील अशी जे कोणी खोदाई काम करत असतील त्यांनी प्रथम आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून पाईप लाईनचा नकाशा समजून घेवुनच काम करावे , अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल , असे फलक लावून आदेश काढणे गरजेचे असताना असे नियोजन कुठेच दिसत नसल्याने त्याचे परिणाम कर्जतकर नागरिकांना भोगावे लागत आहेत.

शुक्रवार व शनिवार जिओ कंपनीच्या अश्याच लापरवाही व पालिकेच्या बेजबाबदार कामामुळे २४ तास पाणी मिळाले नाही . पाणी योजनेतील पाईप लाईन तसेच वीज असणे हा मुख्य भाग असताना त्यावर लक्ष असणे , व या साधनांची सुरक्षा करणे हे काम पालिका प्रशासन , सत्ताधारी व सभापती विसरत असल्याने त्यांच्या नियोजनात किती अभ्यास आहे , हे सर्वश्रुत होत असून नागरिकांना पाण्या अभावी एक दिवस काढावा लागल्याने पालिकेच्या बेजबाबदारपणा व लोकप्रतिनिधींच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे .म्हणून पालिकेने जिओ कंपनीवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कर्जत शहर अध्यक्ष यांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page