Thursday, November 21, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये भाडेकरूंकडून माथाडी नेत्यांची सर्रास खंडणी वसुली, पोलिसांचे दुर्लक्ष...

पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये भाडेकरूंकडून माथाडी नेत्यांची सर्रास खंडणी वसुली, पोलिसांचे दुर्लक्ष ?

पिंपरी चिंचवड ( श्रावणी कामत ) शहरातील उच्चभ्रू सोसायटीत भाडेकरूंकडून स्वयंघोषित माथाडी नेत्यांकडून सर्रास खंडणी वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सर्रास सुरू असुन पोलिस प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे का ?

पिंपरी ११ जुन :- पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू सोसायटीत भाडेकरूंकडून स्वयंघोषित माथाडी नेत्यांकडून सर्रास खंडणी वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार वाढत चालला आहे. संबंधित स्वयंघोषित माथाडी नेत्यांना राजकीय पाठबळ आहे.
पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आदी भागातील अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये धनाड्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्या वेळी येथे भाड्याने राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अकरा महिन्यांच्या करारावर फ्लॅट भाड्याने दिले जात असल्याने त्यानंतर भाडेकरूंना नवीन फ्लॅट शोधावा लागतो, त्यामुळे एजंटलाही सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र, घरसामान शिफ्टिंगदरम्यान संबंधितांची मोठी आर्थिक लूट होत आहे.
खंडणीवसुलीची पद्धत घरसामान शिफ्टिंगच्या वेळी सोसायटीतील सुरक्षारक्षक या माथाडी नेत्यांना खबर देतात. घरसामान शिफ्टिंग होत असताना या नेत्यांचे बगलबच्चे तेथे येतात. “”आम्ही माथाडी कामगार आहोत, आम्हाला न विचारता दुसऱ्या व्यक्तीला कसे काम दिले, आम्हालाही पैसे द्या,” असे म्हणत तीन ते चार हजारांची मागणी करतात. भाडेकरूला याबाबत काहीच माहिती नसते. तोपर्यंत हे माथाडी नेतेही मोटारीतून तेथे दाखल होतात. “”आम्ही माथाडी नेते आहेत” असे म्हणत पैसे देण्यासाठी धमकी देत गोंधळ घालतात. भाडेकरू घाबरून त्यांना पैसे देऊन टाकतो. भाडेकरूने पैसे देण्यास टाळल्यास केल्यास कामगारांना किंवा टेंपोचालकालाही मारहाण केली जाते. पैसे मिळाल्यावर खबर देणाऱ्या सुरक्षारक्षकाला त्याचे कमिशन दिले जाते. कधीकधी या प्रकारात टेंपोचालक किंवा घरसामान शिफ्टिंग करणारे कामगार सहभागी असतात. त्यांनाही कमिशन मिळते.
सदर प्रकरणांमध्ये पोलीस आयुक्तांनी गांभर्यपूर्वक लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष विशाल जाधव यांनी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page