Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळापुणे जिल्हा निर्बंधस्तर 4 मधील ग्रामीण कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाच्या वेळेत वाढ...

पुणे जिल्हा निर्बंधस्तर 4 मधील ग्रामीण कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाच्या वेळेत वाढ…

पुणे : पुणे जिल्हा निर्बंधस्तर- 4 मध्ये ग्रामीण कार्य क्षेत्रामध्ये कोविड – 19 पॉझिटिव्हीटी दर 12.6 % असून ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी 31.57 % आहे त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार दि.7 जुनपासून सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सुरु ठेवण्याचा सुधारित आदेश शासनाकडून पारित करण्यात आला आहे.

त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, व नगरपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता मॉल्स, सिनेमा गृहे, नाट्यगृहे इत्यादीं वरील निर्बंध कायम ठेवत रेस्टॉरंट, हॉटेल्स, उपहार गृहे, खानावळी, शिवभोजन थाळी इत्यादी आस्थापनामधून ग्राहकांच्या बैठकीवर निर्बंध असून फक्त पार्सल सेवा सुरु ठेवण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणे, खेळांचे मैदान ईत्यादी सुविधा सोमवार ते शुक्रवार ह्या दिवशी सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील व शनिवार आणि रविवार या दिवशी पूर्णतः बंद राहतील.

कार्यालयीन कामे 25% उपस्थितीत सुरु राहतील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय समारंभावर बंदी असून लग्न सोहळ्यासाठी जास्तीत जास्त 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर केश कर्तनालाय, ब्युटी पार्लर, स्पा, व्यायामशाळाना सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी चार पर्यंत सुरु राहण्याचे आदेश असून शनिवार व रविवार या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page