मावळ दि.8 : पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीला 16 फेब्रुवारी पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
खेड आणि मावळ तालुका वगळता जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी नियोजित कार्यक्रमानुसार दि.9 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सभेत सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीचे आदेश देण्यात आले होते.
परंतु खेड व मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या त्यामुळे ह्या दोन्ही तालुक्यातील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.
तसेच खेड व मावळ ह्या दोन तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भातील सुनावणी मंगळवारी दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या न्यायालयात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.