Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या डायरीचे लोणावळ्यात प्रकाशन..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या डायरीचे लोणावळ्यात प्रकाशन..

प्रतिनिधी: श्रावणी कामत
लोणावळा – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त शिवसेवा प्रतिष्ठानने एका अभिनव उपक्रमांतर्गत 2025 साठी विशेष डायरी प्रकाशित केली आहे. या डायरीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम लोणावळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या डायरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती, संस्थेची भूमिका, तसेच प्रत्येक पानावर वॉटरमार्क स्वरूपात महादेवाच्या पिंडीचे दर्शन आहे. 365 दिवसांसाठी प्रत्येक पानावर अहिल्याबाईंबद्दल दोन प्रेरणादायी काव्यओळी लिहिल्या आहेत.
डायरीतील 40 लेख सांगलीच्या लेखिका सौ. विनिता तेलंग यांनी रचले असून मुखपृष्ठाचे आकर्षक चित्र पुण्याचे चित्रकार श्री. चंद्रशेखर जोशी यांनी साकारले आहे. डायरीबद्दलची सविस्तर माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. धनंजय चंद्रात्रे यांनी दिली.
प्रकाशन सोहळ्याला प्रमुख वक्त्या सौ. विनिता तेलंग यांनी अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली. त्यांनी अहिल्याबाईंच्या धार्मिक कार्य, देवालये, धर्मशाळा, घाट बांधणी याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच आजच्या तरुण पिढीने अहिल्याबाईंच्या कर्तृत्वापासून प्रेरणा घेत समाजासाठी कार्यरत राहावे, असा संदेश दिला.
कार्यक्रमाला सहायक पोलीस निरीक्षक श्री. जाधव, श्री. सोमनाथ देवकाते (पुणे), श्री. विजय गोफणे (पुणे) यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अजित घमंडे यांनी केले, सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. राजेश कामठे यांनी केले, तर समारोप सौ. संगीता चंद्रात्रे यांच्या “वंदे मातरम्” गाण्याने झाला.
शिवसेवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील लोक या डायरीची चौकशी करत आहेत.
कार्यक्रमातील उपस्थित मान्यवर : दत्तात्रय येवले, ऋषिकेश लेंडघर, अद्वैत बांबोली, चेतन राणे, ब्रिंदा गणात्रा, परमेश्वरी दामले, महेश भुसारी, अशितोष जोशी, देवा भाऊ गायकवाड, निखिल कवीश्वर, आशुतोष आठल्ले, निलाक्षी गोडबोले, शुभदा मराठे (उज्जैन) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
- Advertisment -

You cannot copy content of this page