Friday, September 20, 2024
Homeपुणेपुण्यातील CNG पंपाचा संप आता लांबनिवर...

पुण्यातील CNG पंपाचा संप आता लांबनिवर…

पुणे : पुण्यातील सीएनजी पंपधारकांनी नियोजित संप आता 1 नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे आता 1 नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद राहणार आहे . याचा मोठ्या प्रमाणात ग्राहकांवर परिणाम होणार असून ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे .
सीएनजी पंपांनी 20 ऑक्टोबरपासून बेमुदत CNG विक्री बंद करण्याचा इशारा दिला होता . मात्र , काही दिवसातच दिवाळी असल्याचे कारण पुढे करत बंद पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . पेट्रोल डिलर असोसिएशनच्या म्हणण्यानुसार , जोपर्यंत प्रलंबित थकबाकी ही व्याजासह डीलर्सच्या खात्यात जमा होत नाही तोवर CNG सेल बंद ठेवण्यात येणार आहे .
आज टोरंट CNG संपाच्या मुद्द्यावर , जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी यांची बैठक पार पडली .
- Advertisment -

You cannot copy content of this page