पैसे परत मिळवून दिल्यास रायगडात होणार राजकीय उलथापालथ..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य व विश्वसनीय समजली जाणारी तसेच दिवसाला करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल म्हणून ओळख असलेली पेण को.ऑप.अर्बन बँक संचालकांनी हजारो ठेवीदार – खातेदारांचे व शेतकऱ्यांचे बँकेत असलेले करोडो रुपयांचा घोटाळा करून बँक बुडीत निघाल्याने बंद झाली.
आजपर्यंत कायद्याच्या कचाट्यात अडकलेले खातेदार रुपी शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नसल्याने आशेचा किरण बनून भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे हे चिकाटीने प्रयत्न करत आहेत.त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागजी ठाकूर यांनी भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य प्रबंधक मुंबई , यांच्याकडे पत्र पाठवून लवकरात लवकर कार्यवाही करावी,असे आदेश दिले असल्याने लवकरच पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना व शेतकऱ्यांना दिलासादायक माहिती मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागजी ठाकुर यांची भेट घेऊन रायगड जिल्ह्यातील पेण को.ऑप.अर्बन बॅंक मोठ्या बँकेत विलीनीकरण करावे किंवा बँकेच्या सर्व मालमत्ता ,जागा विकून ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे परत द्यावेत,अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती .त्याचप्रमाणे येथील खातेदार हा शेतकरी बांधव आहे , त्यांच्या व्यथा देखील त्यांनी मांडल्या होत्या,त्यास अनुरागजी ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रकरणी लवकरच आढावा घेऊन कारवाई करू,असे आश्वासन सुनील गोगटे यांना दिले तसेच सर्व दोषींवर सक्त कारवाई करून शेतकरी ठेवीदारांना व खातेदारांना न्याय देऊ,असे आश्वासन दिले होते.
त्याच आश्वासनाची पूर्तता म्हणून त्यांचे कार्यालयातून संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्याच्या हेतूने एक पाऊल पुढे असे,आज वित्त मंत्रालय नवी दिल्ली येथून त्यांचे विभागीय अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी पत्राद्वारे कळविले आहे की , याबाबतीत त्यांनी मुख्य महाप्रबंधक भारतीय रिझर्व्ह बँक – मुंबई यांचे कडे उचित कार्यवाही साठी पत्रव्यवहार करून दोषींवर कारवाई व ठेवीदारांच्या पैसे मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना व खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचे कामी गती येईल.
असे असून आपण पेण अर्बन बँकेच्या शेतकरी ठेवीदारांना व खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत,असे मत किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी व्यक्त केले आहे.पेण अर्बन बँकेचे खातेदार व ठेवीदार संपूर्ण रायगड जिल्ह्यात असून ते जवळपास दोन लाखांच्या घरात आहेत.
बँक बुडालेली आज १० वर्षे उलटून गेली आहेत , सर्वांना आपली हक्काची पुंजी केंव्हा मिळणार हि आस लागून आहे . याबाबतीत भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे शेतक-यांच्या या पैशांसाठी अथक प्रयत्न करत असताना जर त्यांना यश आले व ठेवीदार – खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळाले , तर भविष्यात राजकीय उलथापालथ होऊन रायगड जिल्ह्यातील सर्व सातच्या सात आमदार हे भारतीय जनता पक्षाचे असतील , यांस तिळमात्र हि शंखा नसेल , असे राजकीय तज्ञांचे मत आहे.