Tuesday, September 17, 2024
Homeपुणेमुळशीपौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले , चार जन जखमी….

पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले , चार जन जखमी….

पुणे: मुळशी तालुक्यातील पौडजवळ AW 139 नावाचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अपघात घडला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई वरून हैदराबादला जात असताना ही दुर्घटना घडली.या घटनेत हेलिकॉप्टर पायलट सह आणखी तीन जन जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबतच तीन सहकारी जखमी असल्याचे समजले. जखमींना हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून .हेलिकॉप्टर मधील प्रवाशी 1) आनंद कॅप्टन (जखमी),2) दिर भाटिया (प्रकृती स्थिर), 3) अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर).,4) एस पी राम (प्रकृती स्थिर) अशी अपघातातील जखमिंची नावे आहेत.अपघात घडल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page