Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडप्रत्येक कार्यकर्त्यांचे नेतृत्वगुण विकसीत झाले पाहिजेत - विली डॉक्टर..

प्रत्येक कार्यकर्त्यांचे नेतृत्वगुण विकसीत झाले पाहिजेत – विली डॉक्टर..

कर्जतमध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न…

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)गरीब – गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गरुड भरारी घेण्यासाठी कवचकुंडल रुपी सहाय्य करणारी ” लाईट ऑफ लाईफ ” या संस्थेचे झालेले वटवृक्षात रूपांतर हा कर्जतच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक ” सुवर्ण युग असून कर्जत तालुक्यातील २५ विद्यार्थ्यांपासून सुरु केलेले शैक्षणिक कार्य गेल्या १७ वर्षामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरीसा आणि राजस्थान या राज्यामध्ये पोहचले आहे , म्हणूनच ट्रस्टच्या या शैक्षणिक कार्याची दखल महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल यांनी घेऊन त्यांच्या हस्ते गौरविण्यात देखील आले आहे , हे संस्थेचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.


“लाईट ऑफ लाईफ ” ट्रस्टच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी दरवर्षी ‘मंथन’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनामध्ये कार्यकर्त्यांची वैचारिक पातळी वाढविण्यासाठी तसेच लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्कृती विषयी माहिती करुन देणे हा प्रमुख उद्देश राहीलेला आहे.


गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात हे संमेलन फक्त ऑनलाईन पध्दतीने झाले होते,कार्यकर्त्यांना “उद्दिष्ट प्राप्तीसाठी नेतृत्व विकास ” ही प्रमुख संकल्पना घेऊन ‘मंथन ‘एक वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील युनिर्वसल बिझनेस स्कूल, कुशीवली येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे वार्षिक संमेलन संपन्न झाले.या संमेलनामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरीसा आणि राजस्थान या राज्यातील १५० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.


यावेळी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका विली डॉक्टर, ॲश्दीन डॉक्टर (ट्रस्टी), रमेश दासवानी (सी.ई.ओ.), कमल दमानिकया (सी.ओ.ओ.) जया अहुजा, सुधिकुमार गजभिये (एच.ओ.ई.) तसेच युनिर्वसल बिझनेस स्कूलचे चिमा ब्रिगेडीयर (संचालक), तरुण आनंद (अध्यक्ष) यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली.


लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट “ भारत देशामध्ये देशभक्ती आणि देश शक्तीचे काम करीत आहे ”. ट्रस्टमधील कार्यकर्ते हे ऊन – वारा – पाऊस न बघता केवळ काम करत नसून ते भारत देशासाठी आपले योगदान देत आहेत. सर्वांचे हे योगदान अद्भूत आहे. ‘ मंथन ’ या वार्षिक संमेलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे नेतृत्वगुण विकसीत झाले पाहिजेत , प्रत्येकांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे , तरच खऱ्या अर्थाने सर्वांना आनंद मिळेल. असे उद्गार उदघाटन प्रसंगी ट्रस्टच्या संचालिका विली डॉक्टर यांनी काढले.यावेळी आपल्या कार्यात अग्रेसर असणाऱ्या अनेकांचा सन्मान करण्यात आला.

- Advertisment -

You cannot copy content of this page