Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडप्रधान मंत्री पिक विमा योजनेला बारणे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रधान मंत्री पिक विमा योजनेला बारणे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद !

पोलीस मित्र संघटनेचे कोकण उपाध्यक्ष तथा शिवसेना सहकार ता. प्रमुख दशरथ मूने यांचा पुढाकार..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” झाली पेरणी पिकाची , वेळ विमा भरण्याची – रक्षा होई शिवाराची, हमी ही सरकारची ” या बोध वाक्याने शेतकरी बांधवांच्या पिकांची सुरक्षा व्हावी , या उद्दात भावनेने दूरदृष्टी ठेवून ” प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम – २०२३ ” या योजने अंतर्गत १ रुपयात पिक विमा योजना देशभर सुरू असून या योजनेचे बारणे येथे ग्रामपंचायत सावेळे तसेच कर्जत तालुका कृषी विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने श्री महालक्ष्मी मंदिरात ” पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना सहकार कर्जत तालुका प्रमुख ” श्री. दशरथ नानू मुने यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास असंख्य शेतकरी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी या कार्यक्रमाचे महत्त्व , फायदा व इतर माहिती सावेले ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक केशव जाधव व तालुका कृषी सहाय्यक – भोईरवाडी श्रीमती स्मिता गावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले , तसेच बारणे येथील पोलीस पाटील श्री .धनाजी मुने यांनी या कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले . या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना सहकार कर्जत तालुका प्रमुख श्री दशरथ नानू मुने यांच्या पुढाकाराने सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा प्रचार प्रसार करण्यात आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमास बारणे येथील ग्रामस्थ निल आप्पा मुने , भास्कर मुने , आदी मान्यवर उपस्थित होते . सदर मेळाव्यात सावेळे ग्रामपंचायत पंचक्रोशीतील बारणे, सालोख , सावेळे ,भोईर वाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रधान मंत्री पिक विमा योजनेत आपले नाव नोंदणी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page