![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” कर्जतमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक “
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्यात महापुरुषांबद्दल गरळ ओकण्याचे षडयंत्र दिवसेंदिवस वाढत असून गरळ ओकणाऱ्या विकृतांना त्यांची जागा व प्रसंगी त्यांना हिसका दाखविण्यास संभाजी ब्रिगेड सक्षम असून प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करणेबाबत आज कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल व्हावा यासाठी संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व शिवप्रेमींनी निवेदन दिले.
नागपूर मधील प्रशांत कोरटकर या विकृत व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे , तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे , असे या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात किंवा कारवाई करण्याबाबत गांभीर्य दाखवले नाही, तर संभाजी ब्रिगेड व सर्व शिवप्रेमींच्या वतीने राज्यभर कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल , असा इशारा संभाजी ब्रिगेडचे कर्जत ता. अध्यक्ष रोहिदास लोभी यांनी दिला आहे . सदरचे निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे सामाजिक तसेच राजकीय विंग चे कोकण उपाध्यक्ष आकाश कांबळे , तालुका अध्यक्ष रोहिदास लोभी , संभाजी ब्रिगेड (सामाजिक) तालुका अध्यक्ष विशाळ माळी , इतिहास संशोधक व लेखक वसंत कोळंबे , मराठा सेवा संघांचे अध्यक्ष अनिल भोसले , सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील श्रीकांत आगिवले , दिपक भालेराव , सतीश देशपांडे , दिलीप लोभी ,विलास सांगळे , सुनील ठोंबरे , अविनाश भिंगारे , तसेंच शिवराय प्रतिष्ठान बीड बु. मार्फत मनोज रुठे , आनंद लोभी व इतर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.