Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडप्रांत मॅडम वैशाली परदेशी तहसीलदार देशमुख व नायब तहसीलदार राठोड यांनी...

प्रांत मॅडम वैशाली परदेशी तहसीलदार देशमुख व नायब तहसीलदार राठोड यांनी केली पाहणी..

उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील पाली आदिवासीवाडी शेजारी दरड कोसळली..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील पाली आदिवासी वाडी शेजारील दरड कोसळली असून त्याची पाहणी कर्जत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी ,तहसीलदार विक्रम देशमुख व नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली.

कर्जत तालुक्यात आज पाच दिवस अतिवृष्टी होत असून आज भरमसाठ प्रमाणात पाऊस पडल्याने उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील पाली आदिवासीवाडी ही पाली भुतवली धरणामुळे पुनर्वसित केलेली वाडी डोंगराच्या शेजारीच आहे.जोरदार पावसाच्या पाण्यामुळे माती विस्खलित होऊन दरड कोसळल्याची घटना घडली ,यामुळे माती ,दगड खाली येऊन सर्वत्र वाडीत पसरले.मात्र कुणाचे नुकसान झाले नसून मात्र सतत पाऊस पडल्यास नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


ज्या घरांना धोका आहे ,तेथील नागरिकांना समाजमंदिर व इतरत्र हलविण्यात आले असून त्यांच्या खण्यापिण्याचा बंदोबस्त करण्यात येईल,असे प्रांत अधिकारी वैशाली परदेशी व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.व येथील सर्व पाली गाव व वाडीतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे सांगितले आहेे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका युवा अध्यक्ष सागर शेळके हे देखील उपस्थित होते.व सर्वांना ग्रामस्थांच्या मदतीने हातभार लावत होतेे.

- Advertisment -

You cannot copy content of this page