Monday, August 4, 2025
Homeपुणेलोणावळाप्राचार्य रामदास दरेकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्सहात संपन्न...

प्राचार्य रामदास दरेकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्सहात संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही पी एस विद्यालयाचे प्राचार्य रामदास दिगंबर दरेकर यांचा सेवा निवृत्ती समारंभ उत्सहात पार पडला.
दरेकर सर 1990 या साली व्ही पी एस हायस्कुल व द पु मेहता कनिष्ठ विद्यालय येथे क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले. शांत, संयमी असे व्यक्तीमत्व असणारे दरेकर सर यांनी विध्यार्थ्यांना शिस्त लावताना शांत व संयमी गुणांमुळे ते विध्यार्थी वर्गात सर्वांचे चाहते झाले.
पंतप्रधान ढाल स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. तर क्रीडा क्षेत्रात अनेक ठिकाणी सर्वोत्परी शाळेचे नाव लौकिक करून पारितोषिके मिळवून दिली. प्राचार्य दरेकर यांनी फक्त शालेय विध्यार्थी न घडवता शहरातील विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत क्रीडा स्पर्धेत शाळेचे नाव लौकिक केले, शहरातील क्रीडा स्पर्धा भरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो.
अशा या शांत व संयमी प्राचार्य रामदास दरेकर सर यांचे शालेय सेवेतील 32 वर्ष पूर्ण झाल्याने शाळेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ या छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन दि.15 ऑक्टोबर रोजी प्रकाश हॉल मध्ये करण्यात आले होते .
यावेळी प्राचार्य दरेकर यांच्या पुढील सुखदाई जीवनासाठी शुभेच्छा देताना संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, राजकीय पुढारी, मित्र व माजी विध्यार्थी यांनी निरोप समारंभाला उपस्थित राहून प्राचार्य दरेकर सर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच 32 वर्ष शाळेतील सेवेला दिल्यानंतर सेवा निवृत्त कार्यक्रमात उपस्थितांचे आभार व्यक्त करताना सत्कारमूर्ती प्राचार्य दरेकर यांचे डोळे पाणावले होते तर हृदय कासावीस झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page