सुधाकर भाऊ घारे यांचा पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर पलटवार !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत मतदार संघात ” हुकूमशाही ” करून , अधिकारी वर्गावर ” दबाव ” टाकत स्वतःची पोळी भाजण्याचे काम आमदार महेंद्र थोरवे हे करत असून त्यांनी गुंडाराज आणून येथे ” बिहार ” करण्याचे काम करत आहेत , ” सत्तेसाठी फितुरी करणारे हे कसले छत्रपतींचे मावळे ” ? असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब ठाकरे असते तर यांना रायगडाच्या ” टकमक ” टोका वरून ” कडेलोट ” केला असता , असा घणाघाती पलटवार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राजिपचे मा. उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या महाड येथील टिकेला कर्जत येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन चोख उत्तर दिले.
यावेळी या पत्रकार परिषदेत प्रदेश महासचिव भरत भाई भगत , युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , महिला विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर , जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पूजा सुर्वे , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , जिल्हा संघटक दिपक श्रीखंडे , रवि झांजे , मा. सभापती धोंडू राणे , जुआरी, मा. नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे , दिलीप गुरव , मा. नगरसेविका मधुरा चंदन , मा. नगरसेविका सुवर्णा निलधे , युवा अध्यक्ष स्वप्नील पालकर , जयेंद्र देशमुख , केतन बेलोसे , सोमनाथ पालकर , कडू , मनिषा ठोंबरे , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुधाकर भाऊ घारे हे संतप्त होत , आमदार थोरवे यांचा खरपूस समाचार घेत ते ” जिंदगी जिंदा दिली का नाम “, अशी टीका करतात , मात्र यांना माहित नाही , तटकरे साहेब हे देशातील नेते आहेत . संसद भवनातील त्यांचे भाषण सर्व देशास पसंतीस उतरले , या जिल्ह्याचा विकास कुणी केला तर तो ” कोकणचे भाग्य विधाते खासदार सुनील तटकरे साहेबांचे ” नाव प्रथम घेतले जाते , हे सांगत नुसता ” नॅपकिन ” उडवला तर यांची पायाखालची जमीन हादरली आहे , सन २०१४ च्या निवडणुकीत आमदार भरत गोगावले हे बरोबर नसताना देखील तटकरे साहेब खासदार झाले हे विसरता कामा नये , यावर सुधाकर भाऊ घारे यांनी प्रकाश टाकला . नेरळ येथे आमदार थोरवे यांच्या कार्यकर्त्याला मारहाण , माथेरान नगराध्यक्ष सावंत यांच्या पतीला मारहाण , माजी सभापती पंढरी राऊत यांना मारहाण , असे एक ना अनेक वाईट घटना घडतात त्यात यांचाच हात आहे . यावेळी त्यांनी कर्जत खालापूर मधील ६ प्रमुख पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरी वाचून आमदार महेंद्र थोरवे यांच्या गुन्हेगारी व दबावतंत्र वापराचा पाढाच वाचला . सर्व पोलिस ठाण्यात अधिकारी वर्गावर दबाव टाकले जाते , भोर साहेब , यांच्या स्टेशन डायरीत आमदार विरोधात लिहिले आहे , राजकीय द्वेषातून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव , असा घेरडीकर यांचाही जबाब स्टेशन डायरीत आहे , पत्की मॅडम यांचाही डायरीत दबाव एन्ट्री लिहिली आहे , भास्कर दिसले यांची दुकाने तोडा , असाही पोलिसांना फोन ची नोंद , शरद हजारे , यांच्या विरोधात जाऊन बोलल्याचे डायरीत दिसून येत आहे . हे सर्व पुरावे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे देणार असून कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले . सांगवी व इतर गावातील दरडग्रस्त भागासाठी आदिती ताई व तटकरे साहेब यांच्या प्रयत्नातून ३० कोटी रु. मंजूर होत असताना जिल्हाधिकारी यांना थोरवे यांनी पत्र देऊन तो निधी कॅन्सल करून इतर गावाला द्या , असे दिलेले पत्र त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले . भविष्यात या दरडग्रस्त परिसरातील आदिवासी बांधवांची जीवितांनी झाल्यास त्यास थोरवे जबाबदार असणार आहेत , असा आरोप देखील सुधाकर भाऊ घारे यांनी केला.
फॉरेस्ट विभागात असलेले फार्म हाऊस , त्यांचा भाऊ मनोहर थोरवे यांचे ” सुंदर ” नावाचे रिसॉर्ट गुरुचरण हद्दीत आहे , याची चौकशी व्हावी , तर आमदारांच्या बंगल्याच्या समोर असलेले ग्रामपंचायतीचे तलाव ताब्यात घेतले आहे , याच्यावर देखील कारवाई व्हावी , म्हणूनच आता आमदार थोरवे यांचीच ” उलटी गिनती ” सुरू झाली आहे , तुम्ही पुढच्या वेळी आमदार व्हाल का ? याचे उत्तर तुम्हाला कर्जत मतदार संघातील जनता देईल , असा समाचार घेत २०० स्टेशन डायऱ्याचा रिपोर्ट असून आजपर्यंत काय काय कारनामें केले आहेत , हे समोर आणून या मतदार संघात ” तोंड ” दाखवायला जागा ठेवणार नाही , असा इशारा त्यांनी आमदार थोरवे यांना देत आमदार थोरवे हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून त्यांनी कुणाला रोजगार दिला , टक्केवारी घ्यायची , व आमच्या माध्यमातून होत असलेली कामे पत्र देऊन रोखायची , खोपोली येथील नाट्य गृह , शिव स्मारक , दवाखान्याचे काम , खोपोलीत होत असलेला भ्रष्टाचार यामध्ये देखील आमदार थोरवे यांचाच हात असल्याचे घारे यांनी सांगून , भिसेगाव भुयारी मार्ग होणार नाही , उड्डाण पूल होणार हे देखील त्यांचेच कारस्थान असल्याचे सांगितले . यावेळी भरत भाई भगत , बैलमारे , साखरे , सुरेखा खेडकर , यांनी देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी महाड येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करत , स्वताला आवरते घ्यावे , अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी पत्रकार परिषदेत दिला .