![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा : वलवण येथील दर्शन व्हॅली सोसायटीतील एका बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी हात साफ केला होता. या प्रकरणात लोणावळा शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
६ जुलै २०२५ रोजी लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दर्शन व्हॅली सोसायटीमधील बंगला क्रमांक ४४ येथे चोरी झाली होती. मनीषा जैन यांनी याबाबत घरफोडीची फिर्याद दिली होती.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली असता दोन व्यक्ती बंगलीत चोरी करत असल्याचे आढळून आले. स्थानिक बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. हे दोघे वरसोलीतील एका भंगार दुकानात काम करणारे कामगार असल्याचे उघड झाले.
पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोउनि शकील शेख, पो.ह. देविदास चाखणे, पो.कॉ. कमठनकर आणि संजय तिखे यांच्या पथकाने कारवाई करत विजय दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २४, रा. वरसोली, मुळगाव उत्तर प्रदेश) याला अटक केली. आरोपीकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.