Friday, August 1, 2025
Homeपुणेवडगावबंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याकडून 1 लाख 97 हजाराच्या दागिन्यांची चोरी...

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याकडून 1 लाख 97 हजाराच्या दागिन्यांची चोरी…

मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ मधील बंद ढोरे वाडा येथील घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने 1 लाख 97 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार दि .10 सायंकाळी 7:30 ते मंगळवार दि .11 सकाळी 6:30 या कालावधीत घडली.
याबाबत शैलेंद्र रामचंद्र ढोरे ( वय 51 , रा . वडगाव मावळ , जि . पुणे ) यांनी वडगांव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , वडगाव मावळ येथे फिर्यादी ढोरे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला . घरातील सोन्याची साखळी , अंगठी , कानातले टॉप्स , कानातली बाळी असा सुमारे 19 ग्रॅम वजनाचे 1 लाख 97 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले आहेत . पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page