if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील सर्वच बचत गट व मायक्रोफायनांस कंपन्या महिलांना तसेच नागरिकांना जबरदस्तीने व अत्यंत वाईट शब्दात दमदाटी करून वसुलीसाठी घरात घुसतात त्यांच्या या दंडेलशाही – मुजोर कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्जत तहसिल कार्यालयावर धडक देत विशाल मोर्चाचे आयोजन केले , मात्र कोरोना महामारीचा काळ असल्याने फक्त पदाधिकारी यांनीच जाऊन नायब तहसिलदार संजय भालेराव यांना निवेदन सादर केले . यावेळी तालुक्यातुन अनेक महिला उपस्थित झाल्या होत्या.
सध्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत सर्वच मानसिक – शारीरिक – आर्थिक त्रासामुळे मेटाकुटीस आले असताना या परिस्थितीचे भान न ठेवता व शासनाच्या कर्ज वसुली करू नये , ती वसूल करताना जोर जबरदस्ती करू नये , या आदेशाला केराची टोपली दाखवीत बचत गट व मायक्रोफायनांस कंपन्या अतिरेक करत आहेत.
ग्रामीण तसेच शहरी भागातील बरेचसे नागरिक रेल्वे मार्ग बंद असल्याने बेरोजगार आहेत . अशा परिस्थितीत घर खर्च चालविणे कठीण झाले असताना या मायक्रोफायनांस कंपन्या वसुलीसाठी प्रत्येक गावात त्यांचे कर्मचारी पाठवीत आहेत . हे कर्मचारी उद्धट भाषा वापरून महिलांना दमदाटी करत असताना भांडणाचे स्वरूप येऊन कायदा – सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत.
याबाबत अनेक तक्रारी मनसे कडे आल्याने कर्जत तालुक्यात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दंडेलशाहीचा जाब शासन दरबारी विचारण्यासाठी कर्जत तहसिल कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन केले होते . यावेळी तालुका व शहरातील पदाधिकारी यांनी धडक देऊन शासनाला याचा जाब निवेदनामार्फत विचारला.
वरील सर्व परिस्थितीचा शासन दरबारी जाणीव असताना मायक्रोफायनांस कंपन्यांना व बचत गटास कर्ज माफीचा आदेश द्यावा , जेणेकरून सर्व महिला बचत गटातील महिलांचं कर्ज माफ होईल , व त्यांना दिलासा मिळेल या मायक्रोफायनांस कंपन्यांना रोक लावा अन्यथा मनसे स्टाईलने आम्ही त्यांना रोक लावू , असा इशारा मनसेचे कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण यांनी सडेतोड मत व्यक्त केले.
यावेळी हा धडक मोर्चा मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय दुर्गे नगरसेवक, कर्जत नगरपरिषद , समीर चव्हाण – कर्जत शहर अध्यक्ष,चिन्मय बडेकर – शहर सचिव , रांकित शर्मा- शहर उपाध्यक्ष,मितेश महापुरे- शहर उपाध्यक्ष,राजेश साळुंके -शहर उपाध्यक्ष,ओमकार मोरे – शहर उपाध्यक्ष, प्रज्योत घोसाळकर – शहर उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी उपस्थित होते . सदर धडक मोर्चाला नारी शक्ती कर्जत यांनी पाठींबा दिला होता .स्वीटी बार्शी , ज्योती जाधव व इतर नारी शक्तीच्या महिला उपस्थित होत्या . यावेळी कर्जत पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवला होता.