भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ज्या रस्त्यासाठी निवेदने – मोर्चे – आंदोलने उपोषणे झाली असा ” बहुचर्चित भिसेगाव ते चार फाटा ” हा रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार होवून अखेर या रस्त्याचे लोकार्पण सोहळा कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी या सोहळ्यास आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , मुख्याधिकारी वैभव गारवे , माजी नगरसेवक बाळाजी विचारे , राहुल डाळींबकर , उमेश गायकवाड , सोमनाथ ठोंबरे , पुष्पा दगडे , जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे , मा. नगरसेविका यमुना विचारे , कर्जत ता. प्रमुख संभाजी जगताप , आर पी आय चे ऍड. उत्तम गायकवाड , मा. नगरसेवक संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम खान , उपशहर प्रमुख मोहन भोईर , सचिन खंडागळे उपशहर संघटक , नारायण जुनघरे शहर सहसंपर्क प्रमुख , तेजस गायकर उपशहर अधिकारी , विनोद डुलगज शाखाप्रमुख , शरद हजारे आमदार साहेब यांचे कट्टर शिवसैनिक , शिवलिंग बकलिंगे उपविभागप्रमुख , मोहन साळोखे विभाग अधिकारी , अतिश देशमुख उपविभाग अधिकारी , संजय जाधव उपशाखा प्रमुख , महेश मंडावळे शाखाधिकारी , चेतन खंडागळे उपशाखा अधिकारी , सचिन भोईर , सनी चव्हाण , दिनेश कडू , अनंता जुनघरे , पोलीस पाटील संजय हजारे , पुंडलिक भोईर , ज्योती जाधव , नागेश भरकले , गणेश गोसावी , पंकज पवार , नाथा हजारे , वाय के कुंभार , अमोघ कुलकर्णी , उदय शिंदे , राकेश देशमुख , शहर संघटिका सायली शहासणे , राकेश दळवी , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर , ग्रामस्थ व भिसेगाव नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करून बाळाजी विचारे यांनी या रस्त्याबाबत किती खस्ता खाल्ल्या व अखेर ” दमदार आमदार ” महेंद्र शेठ थोरवे यांनी या रस्त्याला भरघोस निधी आणून तो तयार झाला हे प्रस्तावनात सांगितले , तर मा. नगरसेवक राहुल डाळींबकर यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेल्या तालुक्यातील सर्व विकास कामांचा झंझावात सांगितला . यावेळी महेंद्र शेठ थोरवे यांनी या रस्त्यासाठी आंदोलने , मोर्चे झाले , या रस्त्यासाठी अनेकांनी खूप वर्षे संघर्ष केला तरीही हा रस्ता प्रलंबित होता.
मा. नगरसेविका यमुना विचारे यांनी या रस्त्याची मागणी केली होती , त्याचप्रमाणे ज्योती जाधव , अमोघ कुलकर्णी यांनी पाठपुरावा केला , तसेच गावातील अनेकांनी निवेदने देवून मोठे कार्य केले , यावर प्रकाश टाकला .ते पुढे म्हणाले की आजपर्यंत ९०० करोड रुपयांचा निधी या मतदार संघात आणून विकास कार्य केले आहेत , आचार संहिता लागण्याच्या अगोदर भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचां जोर धरला आहे , म्हणूनच आज शहरापासून ग्रामीण भागात बदलते चित्र पहाण्यास मिळत आहे , ऐतिहासिक वास्तूत हजारो नागरिक जाऊन विसावा व नतमस्तक होत आहेत , उल्हास नदीवर बोटिंग ची व्यवस्था आपण करणार असून नैसर्गिक सौंदर्यात भर पडणार आहे , असे मत व्यक्त केले.
तर येणाऱ्या काळात होणाऱ्या कामांची घोषणा करताना त्यांनी ” भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर भवन ” हे गुलमोहर रेस्ट हाऊस समोर होणार असून हि जागा १३ गुंठे असून लवकरच भूमिपूजन होईल ,लोकसभेची आचार संहिता संपल्यावर पहिलं काम ते असेल , यासाठी मंजुरी मिळाली आहे , कर्जतच्या पाणी योजनेला ५७ करोड निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मंजूर केला असून लवकरच काम सुरू होईल , १०० बेड चे हॉस्पिटल मंजूर होणार आहे , कर्जतच्या विकासाला चालना देण्यासाठी हि सर्व कामे होणार आहेत . तर जय अंबे भवानी मातेच्या मंदिरासाठी भरघोस निधी देणार , शिवाय ज्या भुयारी मार्गासाठी स्वर्गीय अनंत काका जोशी , पुंडलिक भोईर , तसेच भिसेगाव ग्रामस्थ यांनी संघर्ष केला तो भिसेगाव ते कर्जत रेल्वे भुयारी मार्ग मंजुर होवून निधी मंजूर पत्र रेल्वेला पाठविले असून त्यास ” स्वर्गीय अनंत काका जोशी मार्ग ” असे नामकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भिसेगावं येथील सहा आसनी रिक्षा चालक व सिद्दी विनायक सोसा . तसेच अनेकांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.