Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबहुजन समाज पार्टीचे कर्जत विधानसभा अध्यक्ष योगेश आप्पा गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या...

बहुजन समाज पार्टीचे कर्जत विधानसभा अध्यक्ष योगेश आप्पा गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सामाजिक जाणीवतेचे भान ठेवून आपणही या समाजाचे देणे आहोत , या उद्दात हेतूने प्रेरित होऊन आपला वाढदिवस दरवर्षी विविध लोकपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करणारे व छत्रपती शिवाजी महाराज – फुले – शाहू – आंबेडकरी विचारधारा बहुजन समाजात रुजवून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात नेहमीच अग्रेसर असणारे बहुजन समाज पार्टी चे कर्जत – खालापूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष तथा कर्जत तालुका भीम जयंती महोत्सवाचे पदाधिकारी व भीम गर्जना मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष योगेश आप्पा मारुती गायकवाड यांचा स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजीचा वाढदिवस सामाजिक – शैक्षणिक – लोकपयोगी वस्तूंचे वाटप , महिलांचे सबळीकरण , विद्यार्थी व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रत्येक वर्षी नागरिक , विद्यार्थी, व महिलावर्ग यांच्या हिताचे व महत्वाचे उपक्रम राबविणे हे जणू कर्जत बौद्ध नगर येथे रहाणारे योगेश आप्पा गायकवाड यांचे जीवनाचे माध्यम झाले आहे . म्हणूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अतिशय नम्र स्वभावाचे ,सर्वांचा आदर ठेवणारे योगेश आप्पा गायकवाड सर्वांच्याच मनात घर करून विद्यार्थ्यांना भविष्यात स्फूर्ती मिळावी , त्यांचे करिअर व्हावे , महिलांचे आर्थिक सबळीकरण व्हावे यासाठी तसेच वृक्षारोपण , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर , महापुरुषांच्या जयंती महोत्सव घेऊन देशव्यापी व बहुजन समाजात उल्लेखनीय कार्य करत असतात .बहुजन समाजाला योग्य मार्ग दाखविणारे ज्येष्ठ विभुतींना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहित करत असतात . कोरोना काळात देखील त्यांनी नागरिकांना अन्न – धान्य , कौटुंबिक वस्तू मदत देऊन खूप मोठे कार्य केले.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष योगेश आप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले . सकाळच्या सत्रामध्ये छत्री वाटप करण्यात आल्या तसेच संध्याकाळी चार वाजता जीवन शिक्षण मंदिर – कर्जत व कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊवाटप करण्यात आला , आणि रात्रीच्या सत्रामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . यामध्ये पालिकेचे प्रथम उपनगराध्यक्ष तथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम भाई जाधव, आरपीआयचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक तथा भीम महोत्सवाचे अध्यक्ष उमेश आप्पा गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनावणे, ग्रामपंचायत कोंदिवडे सदस्य किशोर गायकवाड, पॅंथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुशील भाई जाधव, भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे , तालुका उपाध्यक्ष राजेश भगत, कर्जत वार्ता चे संपादक प्रशांत खराडे , पत्रकार सुभाष सोनावणे, बाळू गुरव , संकेत घेवारे , अभिजीत दरेकर , सुनील गायकवाड , बी एस पी चे सचिन चव्हाण , यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला बुद्ध पूजा व सूत्रपठन मनोहर ढोले यांनी पार पाडली तसेच सूत्रसंचालन बहुजन समाज पार्टीचे रायगड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी भालेराव यांनी केले . या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेणारे राहुल धनवटे , रोहित सरावते , संतोष अडसुळे , गणेश धनवटे , किरण वाघमारे , विकास गायकवाड , अक्षय गायकवाड , किरण जाधव , हर्षवर्धन कांबळे , पप्पू वाघमारे , प्रदीप हिरे , तुषार बेटकर , आशुतोष कांबळे , कुणाल जाधव , संकेत लोखंडे , संदेश लोखंडे , रोशन शिंदे , आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तर त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खांडपे माजी सरपंच मधुकरभाऊ घारे , नगरसेविका मधुरा चंदन , महेंद्र चंदन पाटील , चेतन सुर्वे , माजी सरपंच मारुती चव्हाण , राहुल गायकवाड त्याचप्रमाणे अनेक नागरिक , महिलावर्ग , मित्र परिवार , कर्जत बौद्ध नगर येथील आप्तेष्ट , योगेश आप्पा गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी व विविध कार्यक्रमात उपस्थित होते . यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . एम पी एस सी परिक्षेत उतीर्ण झालेल्या नेहा राजेंद्र आढाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिवंगत वडील ” मारुती गायकवाड ” यांची कृपा , आई ” नंदा ” यांचे आशीर्वाद , त्याचप्रमाणे नेहमीच सावली सारखी प्रत्येक कार्यात सहभागी असणारी ” पत्नी माही ” व भाऊ ” विकास ” यांची साथ तर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या तसेच मित्र परिवाराच्या सहकार्यामुळेच माझ्या हातून ही समाजसेवा होत असून मी इथवर पोहचलो , असे मत ” भावी नगरसेवक ” म्हणून सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा रुपी प्रेम घेणारे बहुजन समाज पार्टी चे तरुण तडफदार , अध्यक्ष योगेश आप्पा मारुती गायकवाड यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page