खालापूर (दत्तात्रय शेडगे)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील करंबेळी ग्रामपंचायत हद्दीतील बाबदेवपट्टी धनगरवाडा हे गाव गेल्या वीस वर्षांपुर्वी शासनाने दरडग्रस्त व अतिधोकादायक घोशित करून, तात्काळ- अतितातडीने पुनर्वसन करून देतो असे आश्वासीत करूनही, २० वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून, आज तेथील १५ कुटुंबे उध्वस्त होऊन , आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
सरकार आजही त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.तसेच माणगाव मधील कडापूर ते धनवी मार्गे जोर रस्ता व खर्डी ते हुंबरी मार्गे नेराव सुतारवाडी रस्ता या दोन्हीही मार्गांची दैनिय अवस्था झाली असून, वाहतूकीस बंद होण्याच्या तयारीत असल्याने, सामान्य नागरीक व शालेय विद्यार्थ्यांसह दूग्धव्यवसायीकांचे आतोनात हाल होत आहेत.
वरील सर्व गंभीर विषयांवर राष्ट्रीय समाज पक्षाने माजी मंत्री आनंतजी गीते, आमदार भरतशेठ गोगावले, खासदार सुनिलजी तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे व जि.प. बांधकाम विभाग यांच्याकडे पत्र व्यवहार करूनही त्यांनी आश्वासनापलिकडे काहीच केले नाही.
त्याअनुषंगाने जाणीवपूर्वक भोळ्या जनतेचा बळी घेऊ इच्छिणाऱ्या सबंधीत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्ष-रायगड हे कोकण प्रदेश प्रभारी आण्णासाहेब रूपणवर व कोकण प्रदेश अध्यक्ष भगवान ढेबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी माणगाव येथे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे धनवीकर यांनी दिला आहे.
तसे त्यांनी पत्र माणगाव पोलीस स्टेशन, माणगाव तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांना दिले असून, उद्भवणाऱ्या गैरसोयीस सबंधीत प्रशासन व लोकप्रतिनिधी सर्वस्वी जबाबदार असतील असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे.