मावळ : पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी मावळातून बाळासाहेब नेवाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नेत्यांच्या रातोरात झालेल्या पक्ष प्रवेशामुळे समर्थकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
बाळासाहेब नेवाळे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना पुणे जिल्हा सहकारी बँकेचे व जिल्हा दुध उत्पादक संघाचे संचालक होते. त्यावेळी विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्ष श्रेष्ठिवर असलेल्या नाराजी मुळे त्यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत कधीही येणार नाही असे वक्तव्य करून आता पुन्हा अचानकपणे नेवाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच रातोरात झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे नक्की राहायचे कोणत्या पक्षात असा प्रश्न समर्थकांना पडला आहे.