![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
रेल्वेमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी अजून किती उपोषणे करायची , सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांचा संतापजनक सवाल…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील हालीवली व किरवली गावाच्या जवळून होत असलेल्या रेल्वे बोगद्याच्या कामामुळे करत असलेल्या ब्लास्टिंगमुळे डोंगर भाग खिळखिळा झाला असून गावातील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असताना ” इरसालवाडी ” सारखी अतिगंभीर बाब घडून गावांना धोका असून नागरिकांच्या निष्पाप जीवांचा नाहक बळी जाऊ शकतो , अशी संवेदनशील घटना घडण्यापूर्वी रेल्वेच्या ” कर्दनकाळ ठेकेदाराला ” आळा घालून कमी दर्जाचे ब्लास्टिंग घडवून आणा , व नागरिकांच्या घरांचे झालेली नुकसान भरपाई द्या , हि प्रमुख मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२३ रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनी उपोषणाचा मार्ग धरून देखील जर आम्हाला ३ महिन्याचा कालावधी लोटला तरी न्याय मिळत नसेल , तर अजून किती वेळा प्राणांतिक उपोषणे करायची , असा थेट संतप्त सवाल रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना करून त्यांच्यासह त्यांची ” बुजगावणी यंत्रणा ” या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याचे तहसीलदार यांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात येत्या १५ दिवसानंतर आमरण उपोषण करणार असल्याचे संतापजनक मत हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांनी व्यक्त केले आहे .
गेल्या वर्षभरात हालीवली , किरवली येथून जात असलेल्या नविन रेल्वेच्या बोगद्याच्या कामासाठी ठेकेदाराने बेकायदेशीरपणे केलेल्या ब्लास्टिंगमुळे दोन्ही गावांच्या नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे . तर होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जीव मुठीत घेऊन रहावे लागतं आहे . त्या संदर्भात भरभाई व पाण्याची झालेली तूट भरून द्यावी , यासाठी सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी १५ ऑगस्ट २०२३ ला उपोषण केले होते. त्यावेळी कर्जत तहसिलदार शीतल रसाळ यांनी मध्यस्थी करून दोन्ही गावातील ग्रामस्थांना झालेली व होणारी संभाव्य नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते , मात्र आज तीन महिने झाले तरीही ना ब्लास्टिंग ची तीव्रता कमी झाली , ना ग्रामस्थांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली.
या गंभीर बाबीचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी अलिबाग यांना करूनही , ते सदर ठिकाणी पाहणी करण्यास आले नाहीत , त्यामुळे दोन्ही गावातील नागरिक संतप्त झाले असून जिल्हाधिकारी व त्यांची बुजगावणी कर्जत तालुका यंत्रणा नक्की काय काम करतात , कि इरसाल वाडी सारखी भयंकर दुर्घटना घडल्यास तुम्ही येणार का ? असा संतप्त सवाल सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांनी करत येत्या पंधरा दिवसात झालेली नुकसान भरपाई व ठेकेदार करत असलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ब्लास्टिंग चे काम बंद करून त्यामुळे झालेल्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होवून पाणी टंचाईपासून ग्रामस्थांची कायमस्वरूपी पाण्याची उपाययोजना करण्यात यावी व तोपर्यंत ठेकेदाराने कोणतेही काम सुरू करू नये , तसेच यापूर्वी रेल्वेच्या कामामुळे किरवली गावातील दोन ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे , त्यासंदर्भात रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी निवेदनाद्वारे केली असून येत्या पंधरा दिवसात आम्हाला न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करणार , असा इशारा सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी प्रशासनाला दिला आहे .