कामशेत : बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगून हवेत गोळीबार करणाऱ्यांवर कामशेत पोलिसांनी शनिवारी दि.25 रोजी पहाटे कारवाई करत केली.
रूपेश ज्ञानेश्वर वाघोले ( वय 30 , रा . दारुंम्बरे ) , लहु अर्जुन काळे ( वय 34 रा . सांगुर्डी, ता.खेड ) , अमोल ज्ञानेश्वर भेगडे ( वय 38 , रा . तळेगाव दाभाडे ) , गोपाळ ऊर्फ आप्पा धोंडीबा गायके ( वय 47 , रा . कामशेत ) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , खामशेत गावच्या हद्दीतील वाडीवळे रेल्वेगेट जवळील रुचिरा हॉटेलच्या मोकळ्या जागेत दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुशंगाने रुपेश वाघवले , लहू अर्जुन काळे , अमोल ज्ञानेश्वर भेगडे , गोपाळ ऊर्फ आप्पा धोंडीबा गायके यांच्यामध्ये चर्चा चालु असाताना यातील रुपेश वाघवले याने प्रभाव पाडण्यासाठी त्याच्या कमरेला लावलेले बेकायदेशीर पिस्टल काढले व जोश मध्ये येऊन हातातील असलेल्या पिस्टलने हवेत गोळी झाडली.
यासंदर्भात हॉटेल मालक गोपाळ गायके यांनी हॉटेलवर प्रकार घडला असताना फायरींग करणारी मुले निघुन गेल्या नंतर हॉटेल मध्ये पडलेली बंदुकीच्या गोलीची पुंगळी टाकुन दिली व घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली नाही माहिती देने आवश्यक असून हा गंभीर गुन्हयाचा प्रकार लपवुन ठेवल्याने व पुरावा नष्ट केल्या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक गायके यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे . या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार हे करत आहेत.