if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी) : कामशेत हद्दीतील मुंढावरे येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू भट्टीवर कामशेत पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण 50 हजार रु किंमतीची 1 हजार लि. रसायन नष्ट केले.
काल मंगळवारी सायंकाळी 6:45 च्या सुमारास कामशेत पोलिसांनी ही कारवाई केली असून तब्बल एकूण 50,000 रुपये किमतीचे 1,000 लीटर रसायन नष्ट केले आहे. तर हातभट्टी चालवणारी आरोपी पळून गेली आहे.नितु प्रतिक राठोड ( रा . मुंढावरे , ता . मावळ , जि . पुणे ) असे दारूभट्टी चालवणाऱ्या आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल महादेव ननवरे यांनी कामशेत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे .
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी राठोड ही मुंढावरे येथील दगडी खाणीच्या मागे कंजारभटवस्ती येथे गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणाऱ्या मिश्रणात विषारी रसायन ( सडवा ) टाकून सर्व रसायन एकत्र करुन गावठी हातभट्टी तयार करत होती . याची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी तेथे छापा मारला असता पोलिसांची चाहुल लागताच ती पळून गेली .
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप , पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण , सहाय्यक फौजदार समीर शेख , सहाय्यक फौजदार अब्दुल शेख , पोलिस हवालदार गणेश तावरे , पोलिस काँस्टेबल अमोल ननवरे , पोलिस नाईक वाळुंज , महिला पोलिस काँस्टेबल कुंडे मॅडम , पोलीस मित्र गणेश गव्हाणे , आदेश गायकवाड यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलिस हवालदार बनसोडे हे करत आहेत.