Thursday, July 3, 2025
Homeपुणेकामशेतबेपत्ता स्वरांजलीचा सापडला मृतदेह, घातपात की अपघात पोलीस तपास सुरु...

बेपत्ता स्वरांजलीचा सापडला मृतदेह, घातपात की अपघात पोलीस तपास सुरु…

कामशेत : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील सात वर्षीय बेपत्ता मुलीचा आज ( बुधवारी ) तिच्या गावाजवळच एका झुडपात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे . स्वरांजली जनार्दन चांदेकर ( वय 7 वर्ष ) असे मयत मुलीचे नाव आहे.

स्वरांजली ही काल ( मंगळवारी ) तीनच्या सुमारास बेपत्ता झाली होती . त्यानंतर घरच्यांची धावाधाव सुरु झाली . शोध सुर असताना तिचा मृतदेह गावाजवळच एका झुडपात अढळून आला . या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे .

स्वरांजली ही इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होती . सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून कामशेत पोलीस हा अपघात आहे की घातपात याचा तपास करीत आहेत .

- Advertisment -

You cannot copy content of this page