लोणावळा (प्रतिनिधी) : विद्या प्रसारिणी सभेच्या लोणावळा व्हि.पी.एस. विद्यालयाच्या आवरा बाहेर होणारी शालेय विध्यार्थ्यांची हाणामारी होणे हा निंदनीय प्रकार आहे.
हे प्रकार शाळेत घडू नयेत यासाठी शाळा प्रशासनाकडून कायम काळजी घेतली जाते. म्हणूनच असे प्रकार हे शाळेच्या आवाराबाहेर घडतात आणि काही बेशिस्त विध्यार्थ्यांमुळे शाळेचे नाव बदनाम होते. असे निंदनीय प्रकार शाळेच्या आवारात घडले नसले तरी विध्यार्थी मात्र शाळेचेच होते.असे वक्ताविले जाते.असे प्रकार घडू नयेत यासाठी शाळा प्रशासन पूर्ण काळजी घेत आहे परंतु हे प्रकार शाळेच्या आवाराबाहेर घडत आहेत. याची आता पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे.
काही बेशिस्त विध्यार्थ्यांकडून शाळेच्या आवरा बाहेर हाणामाऱ्या होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशा प्रकारांना आळा बसावा, बेशिस्त विध्यार्थ्यांना कोणाचा तरी धाक असावा यासाठी पोलीस प्रशासन ही सज्ज असून. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या सूचनेनुसार व्ही.पी.एस. विद्यालय या परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमले आहे. हे पथक शाळा सुटते वेळी, भरते वेळी तसेच मधल्या सुट्टीत शाळा परिसरात गस्त घालणार आहे. यामुळे शाळेतील बेशिस्त विध्यार्थ्यांना धाक राहिलंच पण त्याचबरोबर इतर रोड रोमिओंकडून शाळेच्या आवारात धांगड – धिंगा करणे, मुलींची झेड – छाड करणे अशा अनुचित प्रकारांना देखील आळा बसणार आहे.