ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने दिली डोंगराला जोरदार धडक,४ जण गंभीर तर २ जण किरकोळ..
खोपोली- दत्तात्रय शेडगेे.
मुबंई पुणे जुन्या महामार्गाने पुण्याहून मुबंई कडे माल घेऊन जात असणाऱ्या आयसर टेम्पो हा बोरघाटात नो एंट्रीतुन खोपोली कडे जात असताना शिंग्रोबा मंदिरा जवळ तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो समोरोल डोंगराला धडकून भीषण अपघात झाला.
या अपघातात टेम्पो मधील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत तर २ जण किरकोळ जखमी झाले असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पुण्याहून मुबंई कडे वायसर चा माल घेऊन आयसर टेम्पो नो एन्ट्री मार्गे खोपोली कडे जात असताना बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळील खिंडीत त्याचा ब्रेक फेल झाल्याने समोरील डोंगराला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला यात टेम्पो मधील ४ जण गंभीर तर २ जण किरकोळ जखमी झाले आहेत त्याना तात्काळ बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
या अपघाताची माहिती मिळतात बोरघाट महामार्ग टीम, खोपोली बिट मार्शल टीम, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पो मधील अडकेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवून दिले.