Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबोरघाट पोलिसांसह यमराज उतरले रस्त्यावर…

बोरघाट पोलिसांसह यमराज उतरले रस्त्यावर…


वाहनचालकांना दिले वाहतुकीचे नियम पटवून,पार्ले बिस्कीट कंपनीचा स्तुत्य उपक्रम..

खोपोली- दत्तात्रय शेडगे
सद्य सगळी कडे ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान जोरदार चालू असून त्याच अनुषंगाने आज बोरघाट पोलिस केंद्र आणि पार्ले बिस्किट कंपनी यांच्या वतीने एक्सप्रेस वेवरील वाहनचालकांना थांबवुन त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली.


बोरघाट पोलीस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक जगदिश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात असलेल्या पोलीस केंद्राच्या समोर आज हे अभियान राबविण्यात आले असून बोरघाट पोलिसांसमवेत यमराज रस्त्यावरउतरलेले पाहायला मिळालेे.

यावेळी अतिवेगाने वाहन चालवू नये, दारू पिऊन किंवा नशा करून वाहन चालवू नये, रस्त्यावर धोकादायक ठिकाणी वाहन पार्किंग करू नये, दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा झ चारचाकी वाहन चालविताना समोर पाहणाऱ्या प्रवाशी व चालक यांनी सीटबेल्ड चा वापर करावा, थकलेले असाल किंवा झोप येत असेल तर वाहन चालवू नये, वाहन चालवताना सतर्क राहून समोरील रस्त्यावर लक्ष ठेवून वाहन चालवावे.

वाहन चालवताना धोकादायक रित्या ओव्हरटेक करू नये, अपघातग्रस्त जखमींना जलदरीत्या औषध व उपचार मिळण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, अंबुलन्स वाहनांना अडथळा करू नये, या नियमांचेमहत्त्व पटवून दिले.

यावेळी बोरघाट पोलीस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक जगदिश परदेशी ,पार्ले कंपनीचे किशोर शेळके ,पोलीस हवालदार, शिंदे, गावंड, जाधव, पाटील, ठाकूर, चव्हाण आदीसह अनेक वाहन चालक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page