मावळ : भडवली गावात सार्वजनिक कार्यक्रमाच्या जेवणातून तीस ते चाळीस लोकांना विष बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार दि.18 रोजी घडला आहे.पवन मावळातील भडवली गावात सार्वजनिक कार्यक्रमात सर्व नागरिकांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यातूनच हा प्रकार घडला असून सर्व बाधित रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर असून काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.30 ते 40 लोकांना ही विष बाधा झाली असून यामध्ये 6 ते 7 लहान मुलांचा समावेष आहे.
काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कान्हे फाटा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. इंद्रनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा पाटील,डॉ. विश्वंभर सोनवणे, डॉ. पोपट आधाते, डॉ.शिवराज वाघमारे हे रुग्णांचा उपचार करत आहेत.