Saturday, November 23, 2024
Homeपुणेलोणावळाभांगरवाडी येथील ड्रेनेज लाईन फुटून मैला रस्त्यावर पसरल्याने नागरिक त्रस्त, प्रशासनाचे मात्र...

भांगरवाडी येथील ड्रेनेज लाईन फुटून मैला रस्त्यावर पसरल्याने नागरिक त्रस्त, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष…

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेकडून मागील एक ते दिड महिन्यापूर्वी भांगरवाडी भागातील आश्रय हार्डवेअर ते सहारा बिल्डिंग हा रस्ता पाईप लाईनच्या कामासाठी खोदण्यात आला होता काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील खड्डाही जे सी बी च्या सहाय्याने बुजविण्यात आला परंतु खड्डा बुजवत असताना मंगरीश सोसायटी समोरील ड्रेनेज लाईन तुटली आहे.

त्या संदर्भात नगरसेवक देविदास कडू यांना येथील रहिवाश्यांनी वारंवार सांगून महिना उलटूनही अद्याप त्या ड्रेनेज लाईनचे काम प्रशासनाने केलेले नाही. हा प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही तर काय आहे.ड्रेनेज लाईन फुटल्याने सर्व मैला रस्त्यावरून वाहत आहे.मंगरीश हौसिंग सोसायटीच्या मुख्य गेट समोरील रस्त्यावर ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे सर्व मैला व घाण पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे, परिसरात दुर्गंधी पसरली आहे.येथील रहिवाश्यांना एक ते दिड महिन्यापासून घाणीच्या साम्राज्याचा सामना करत आरोग्य धोक्यात घालावे लागत आहे.

परिसरात दुर्गंधी पसरली आहे व रस्ता अपुरा असून त्यावर मैला पसरल्याने अपघात होण्याची दाट शक्यताही निर्माण झाली आहे. कोरोना काळात नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत मग असे असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का मग प्रशासन या समस्येकडे का दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मंगरीश सोसायटी मधील रहिवाशी व परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या काळात नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना नगरपरिषदे कडून याची दखल कधी घेण्यात येईल कधी हे घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पासून नागरिकांची सुटका होऊन मोकळा श्वास घ्यायला मिळेल या प्रतीक्षेत आहेत संतप्त नागरिक.

- Advertisment -

You cannot copy content of this page