लोणावळा(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी लोणावळा मंडलचा भव्य कार्यकर्ता मेळावा मा. खासदार व भाजपा जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर मेळाव्याचे औचित्य साधून लोणावळा नगरपरिषदेचे दोन माजी नगरसेवकांनी आज भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला . भाजपा नेते व माजी खासदार किरिट सोमय्या यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.या मेळाव्यात किरिट सोमय्या यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे , भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , माजी आमदार दिगंबर भेगडे , तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड , माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , गटनेते देविदास कडू सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व वलवण नांगरगाव विभागाचे माजी नगरसेवक सुनिल इंगूळकर , काँग्रेसच्या खंडाळा विभागाच्या माजी नगरसेविक कांचन गायकवाड यांच्यासह उद्योजक सुधिर पारिठे , अभय पारेख व सहकारी , प्रतिक बोरकर , रमेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शौकत शेख , देविदास कडू , सुष्मा कडू , सुनिल तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपामध्ये प्रवेश केला.
लोणावळा शहरात भाजपाने केलेल्या कामांवर विश्वास ठेवून इतर पक्षाचे कार्यकर्ते भाजपामध्ये येत असल्याचे याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले . लोणावळा शहरात पुन्हा भाजपाचाच नगराध्यक्ष होणार यात शंका नाही पण आपल्याला यावेळी कोणाच्याही कुबड्यांवर अवलंबून राहयचे नाही .लोणावळा नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवायची असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन केले.