![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” दहिवली सरपंच ते विधानभवन एक संघर्षमय राजकीय प्रवास “…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारतीय जनता पक्षाच्या ” राज्य परिषद सदस्यपदी ” कर्जत खालापूर मतदार संघाचे माजी आमदार ” सुरेश भाऊ लाड ” यांची नुकतीच पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी वर्णी लावली असून त्यानिमित्ताने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण , तर राज्यभरातील प्रमुख नेत्यांची हि ४५४ सदस्यांची कमिटी असून राज्यातील महत्वाच्या विषयांत भाग घेण्याचा या सदस्यांना अधिकार असणार आहे.
कर्जतचे सुरेश भाऊ , एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व . राष्ट्रीय काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – व आता भाजप यात ” दहिवली सरपंच ते विधानभवन ” असा त्यांचा एक संघर्षमय राजकीय प्रवासच म्हणावा लागेल.
गेली ४५ वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणा बरोबरच रायगड जिल्ह्यातील कर्जत – खालापूर मतदार संघात राजकीय पटलावर आपल्या विकास कार्याची – हजरजबाबीपणा व नेतृत्वाची छाप पाडणारे माजी आमदार ” सुरेशभाऊ नारायण लाड ” हे बहु आयामी – असामी – सर्वांवर अधिराज्य करताना दिसत आहेत . दहिवली ते कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील कानाकोप-यात त्यांचा चाहता वर्ग आजही दिसत असताना या मतदारसंघात तीनवेळा ” आमदार ” म्हणून विजयाची हॅट्रिक केलेली दिसून येत आहे.
त्यांच्या या विजयात ते ” लोकनेते ” असल्याचीच छाप दिसत असून राजकीय क्षेत्रात त्यांचा असलेल्या दबदब्यामुळेच पूर्वी काँग्रस मध्ये असताना राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री ए.आर. अंतुले साहेब , तर नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब तर आता भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांना मानसन्मान मिळत असल्याचे चित्र आहे.
आपल्या उभारत्या काळात सुरेशभाऊ राष्ट्रीय काँग्रेस मध्ये काम करत असताना दहिवली – निड येथे ” सरपंच ” पदी विराजमान झाले , मग मात्र त्यांनी आजपर्यंत केलेल्या यशस्वी राजकीय प्रवासात कधीच मागे वळून बघितले नाही . कर्जत तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना सन १९९९ साली झाली .
त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस मधून त्यावेळचे उभरते नेतृत्व व सन १९९२ साली कर्जत पंचायत समितीचे सभापती पद भूषविलेले सुरेशभाऊ लाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले असता ते ” विजयी ” होऊन आमदार झाले.
त्यानंतर सन २००४ ला ते पराभूत झाले , पुन्हा सन २००९ व २०१४ ला विजयी होऊन त्यांनी कर्जत – खालापूर मतदार संघाचे आमदार बनून तीन वेळा प्रतिनिधित्व केले .कर्जत – खालापूर मतदार संघ अध्यक्ष , रायगड जिल्हाध्यक्ष अशी महत्वाची पक्षाची पदे देखील त्यांनी त्यावेळी भूषविली होती.
कर्जत – खालापूर मतदारसंघात विकास कार्य करून त्यांनी आजपर्यंत येथील चेहरा मोहरा बदलला आहे . या मतदार संघाचे राजकारण आजही त्यांच्या नावाभोवती ” घोंघावताना ” दिसत आहे . रायगडच्या राजकीय क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतात .” अजातशत्रू ” म्हणून व कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी ४५ वर्षे राजकारण केले . राजकीय क्षेत्रात आजपर्यंत ज्यांच्या कपाळी त्यांनी राजकीय गुलाल लावला त्यांची ” राजकीय कारकीर्द ” निवडून आणून बदलली आहे . त्यांनी अनेक ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती सदस्य , जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून तर झेड पी अध्यक्ष , उपाध्यक्ष , सभापती बनवून आजही ते तरुणांच्या व दिग्गजांच्या गळ्यातील ” ताईत ” बनून अधिराज्य करत आहेत.
सन २०१९ साली त्यांचा झालेला पराभव अनेकांच्या वर्मी लागला तसा त्यांच्याही लागला . पराभवाची अनेक कारणे पुढे आली , आप्तेष्टच आपल्या पराभवाला कारणीभूत असूनही त्यांनी कुणालाच दुखावले नाही . त्यांनी कार्यकर्त्यांना न दुखावता आपला मार्ग बदलला . त्यांच्यावर असलेला ” वरदहस्त कमकुवत ” झाल्याचे चित्र देखील त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितला , व अखेर एव्हढे वर्ष मैत्री असलेल्या सुनील तटकरे यांची साथ त्यांना सोडावी लागली . ” मी आजपर्यंत पैशाने माणसे गोळा केली नसून , माझी माणसे , कार्यकर्ते जीवाभावाची आहेत ” असे सुरेश भाऊ नेहमीच बोलतात . आज जरी ते भारतीय जनता पक्षात असले आणि शांत जरी दिसत असले तरी या शांतते मागे ” तुफानी वादळ ” घोंघावत असून ते त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांना निवडून आणून दाखवून दिलेले आहे . ते एक ” राजकीय चक्री वादळ ” असल्याचे सिद्ध झाले आहे . राजकीय क्षेत्रात मोठी हलचल करणारा आणि राजकीय पटलावर चमकणारा ” धुरंधर नेता ” म्हणून त्यांची वाटचाल यशस्वीपणे पार पडत असताना भारतीय जनता पक्षात त्यांच्या ” कर्तबगारीची ” दखल घेऊन त्यांना ” महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य ” पदी घेऊन त्यांचा ” सन्मान ” केल्याचे दिसून येत आहे . त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.